Sangli News : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसह (Sangli Agriculture Produce Market Committee) जिल्ह्यातील सात बाजार समित्यांची अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. सात बाजार समित्यांसाठी २४ हजार ५३८ मतदार आहेत.
सांगली बाजार समितीचे तीन तालुक्यांत कार्यक्षेत्र असून ८ हजार ६३५ मतदारांचा समावेश आहे. नव्याने निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांना बाजार समितीसाठी मतदानाचा हक्क मिळाला आहे.
निवडणूक ३० एप्रिलपूर्वी घेण्याचे आदेश देण्यात आले असल्याने बाजार समित्यांचे बिगूल लवकरच लागणार असल्याचे स्पष्ट झाले.
सहकारी संस्थांच्या निवडणुका अखेरच्या टप्प्यात होत आहेत. यावेळी सहकार प्राधिकरणाकडून बाजार समितीच्या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. सात बाजार समित्यांसाठी २५ हजार ५२८ मतदार आहेत.
शिराळा २ हजार ८८६ मतदार, आटपाडी १ हजार ९९२, विटा ३ हजार १५९, पलूस १ हजार १५८, इस्लामपूर ४ हजार ७३९ तर तासगाव बाजार समितीचे १ हजार ९४९ मतदारांचा समावेश आहे.
सांगली बाजार समितीचे तीन तालुक्यात कार्यक्षेत्र असून ८ हजार ६३५ मतदारांचा समावेश आहे. सोसायटी गटातील सर्वाधिक २ हजार ८१४ मतदार, ग्रामपंचायत २ हजार ५२९, हमाल, तोलाईदार १ हजार ७६४ तर व्यापारी, अडते यांचे १ हजार ५२८ मतदार आहेत.
मिरज, कवठेमहांकाळ आणि जत या तीन तालुक्यांत कार्यक्षेत्र असलेली सांगली बाजार समिती राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजली जाते.
यंदा बाजार समितीमध्ये १८ संचालक निवडून जाणार आहेत. बाजार समितीमध्ये सत्ता आणण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रयत्न केले जातात.
एप्रिलमध्ये बाजार समितीची निवडणूक होत असून सोमवारी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे राजकीय हालचाली गतिमान होणार असल्याचे स्पष्ट झाले.
बाजार समिती मतदार संख्या
सांगली - ८,६३५
शिराळा - २,८८६
आटपाडी - १,९९२
विटा - ३,१५९,
पलूस - १,१५८,
इस्लामपूर - ४,७३९
तासगाव - १,९४९
एकूण - २४,५२८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.