Market Committee Election : कारंजात रविवारी मतदान, मतमोजणी

या निवडणुकीकरिता कारंजा येथील मूलजी जेठा नगर परिषद उर्दू हायस्कूल, मंगरूळ वेस, दारव्हा रोड, कारंजा येथे मतदान केंद्र आहेत. या केंद्रांत १९२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.
 Election
ElectionAgrowon

Washim News : वाशीम जिल्ह्यातील कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकरिता मतदान रविवारी (ता. ३०) सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार असून त्याच दिवशी दुपारी ४ नंतर मंगरुळपीर मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समितीतील (Agriculture Produce Market Committee) शेतकरी निवास येथे मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीकरिता कारंजा येथील मूलजी जेठा नगर परिषद उर्दू हायस्कूल, मंगरूळ वेस, दारव्हा रोड, कारंजा येथे मतदान केंद्र आहेत. या केंद्रांत १९२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. सेवा सहकारी संस्थेचे सदस्य व ग्रामपंचायत सदस्य पुढील शहर व गावांतील आहेत.

यामध्ये विविध कार्यकारी सोसायटी संस्था कारंजा, भडशिवनी, दादगाव, धामणी, गायवळ, गिर्डा, कामठवाडा, काकडशिवणी, काळी, पसरणी, पिंपरी (बारहाट), पिंपळगाव, सोहळ, शहा व शेलुवाडा येथील एकूण १९२ मतदार आहेत.

 Election
Sangli APMC Election Update : सांगली जिल्ह्यात बाजार समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला

जिल्हा परिषद शाळा पोहा येथील मतदान केंद्रात पोहा, बेलमंडळ, किनखेड, लोहगाव, लोहारा, महागाव, मुरंबी, पारवा, शेवती, वळवी व वाई येथील १४० मतदार मतदान करतील. जिल्हा परिषद हायस्कूल कामरगाव येथील मतदान केंद्रावर १६६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

यामध्ये कामरगाव, बांबर्डा, बेंबळा, बेलखेड, भुलोडा, जामठी, जानोरी, काजळेश्वर, खेर्डा(बु), लाडेगाव, पलाना, टाकळी शिवण (बु) येथील मतदारांचा समावेश आहे. जिल्हा परिषद केंद्र शाळा धनज (बु) येथील मतदान केंद्रावर धनज (बु), भामदेवी, डोंगरगाव, धनज (खु), हिंगणवाडी, हिवरा (लाहे), लोणी(अरब), माळेगाव, मेहा, पिंपरी (मोडक), राहटी येथील १४३ मतदार मतदान करतील.

उंबर्डा बाजार येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथील मतदान केंद्रांवर उंबर्डा बाजार, दुघोरा, दोनद (बु), धानोरा (ताथोड), इंझा, खेर्डा (कारंजा), पिंपरी (वरघट), सुकळी, वडगाव (रंगे), यावर्डी, येवता व मनभा येथील १५४ मतदार मतदान करतील.

मूलजी जेठा नगर परिषद उर्दू हायस्कूल मंगरूळपीर वेस, दारव्हा रोड कारंजा येथे आखातवाडा, धामणी (खडी), भडशिवनी, गायवळ, गिर्डा, जयपूर, जाबं, काकडशिवनी, कामठवाडा, कोळी, किन्ही (रोकडे), मोखड (पिंपरी), पसरणी, शहा, सोहळ वडगाव (इजारा), वाघोळा, वालई, पिंपळगाव (खुर्द), दादगाव व रामनगर येथील १७३ मतदार, जिल्हा परिषद शाळा पोहा येथील मतदान केंद्रावर बेलमंडळ, किनखेड, लोहारा, लोहगाव, महागाव, मुरंबी, परावा (कोहर), पोहा, शेलुवाडा, शेवती, शिवनगर, तुळजापूर, वढवी वाई येथील १२२ मतदार तर जिल्हा परिषद हायस्कूल कामरगाव येथील मतदान केंद्रावर अंतरखेड, बांबर्डा, बेलखेड, बेंबळा, जानोरी, कामरगाव, कामठा, खेर्डा (बु), काजळेश्वर, लाडेगाव, म्हसला, पलाना पिंपळगाव (बु), शिवण (बु), टाकळी (खुर्द), विळेगाव, बापटी व खानापूर येथील १६९ मतदार मतदान करतील.

 Election
Bhusawal Market Committee Election : भुसावळ बाजार समिती निवडणुकीचा मार्ग मोकळा

जिल्हा परिषद केंद्र शाळा धनज (बु) या मतदान केंद्रावर भामदेवी, भिवरी, ढंगारखेड, धनज (खु), धोत्रा (जहागीर), डोंगरगाव, हिंगणवाडी, हिवरा (लाहे), लोणी (अरब), माळेगाव, मेहा, मोहगव्हाण, निंबा (जहा), राहटी, सिरसोली, तारखेडा, वीरगव्हाण, झोडगा व पिंपरी (मोडक) येथील १६५ मतदार आणि उंबर्डा बाजार जिल्हा परिषद हायस्कूल मतदान केंद्रावर धानोरा (ताथोड), दिघी, दोनद(बु), दुधोरा, इंझा, कार्ली, खेर्डा (कारंजा), मनभा, पिंपरी (वरघट), सोमठाणा, सुकळी, उंबर्डा बाजार, वडगाव (रंगे), यावर्डी व येवता येथील १२७ मतदार मतदान करतील.

मुलजी जेठा नगर परिषद उर्दू हायस्कूल, मंगरूळ वेस, दारव्हा रोड, कारंजा येथील मतदान केंद्रावर व्यापारी व अडते असे ४६७ मतदार व त्याच केंद्रावर हमाल व मापारी असे ३०२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com