
Bhusawal News : भुसावळ येथील बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आखाडा तापल्यानंतर बोदवड उपबाजार समितीच्या विभाजनाबाबत पणन सचिवांनी आदेश काढल्याने निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हे होती तर छत्रपती संभाजीनगर खंडपीठात निवडणुकीला स्थगिती मिळण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेवर सुनावणी होऊन याचिका फेटाळण्यात आल्याने भुसावळ बाजार समितीची निवडणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
पणन विभागाच्या सचिवांनी ६ एप्रिलला राज्य निवडणूक सहकार प्राधिकरणाला बोदवड उपबाजार समितीचे मुक्ताईनगरातून विभाजन ती भुसावळ बाजार समितीला ती संलग्न करण्याबाबत पत्र दिले होते.
त्यामुळे मुक्ताईनगरसह भुसावळ बाजार समितीची निवडणूक लांबणीवर पडणार असल्याची चर्चा होती. मात्र त्या संदर्भात माघारीच्या दिवसापर्यंत आदेश निघाले नसल्याचे निवडणूक सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, शेलवड ग्रामपंचायत सदस्य दीपक माळी व शेमळदे (ता. मुक्ताईनगर) येथील विकासो सदस्य संजय पाटील यांनी खंडपीठात रिट याचिका दाखल करीत निवडणुकीला स्थगिती देण्याची मागणी केली होती.
निवडणूक झाली तरी निवडून आलेल्या सदस्यांचा कालावधी कमी असणार असल्याचा मुद्दा याचिकेद्वारे मांडण्यात आला होता. मात्र गुरुवारी सुनावणीअंती खंडपीठाने ही याचिका फेटाळल्याची माहिती आहे.माघारीनंतर बाजार समितीतील चित्र स्पष्ट झाले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.