Loksabha Election 2024 : नाशिक, दिंडोरीत चुरस वाढली; मताचा टक्का कमी

Election Update : ऐन मतदानाच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या. ज्यामध्ये नाशिक मध्य मतदार संघात आजी-माजी लोकप्रतिनिधी भिडले होते.
Election
ElectionAgrowon

Nashik News : नाशिक जिल्ह्यात नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघांत निवडणुकीपूर्व पक्षांतर, शेतीमालाबाबतचे अस्थिर धोरण व फक्त उरलेल्या घोषणा अशा अनेक मुद्द्यांवर निवडणूक गाजली. ऐन मतदानाच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या. ज्यामध्ये नाशिक मध्य मतदार संघात आजी-माजी लोकप्रतिनिधी भिडले होते.

तर दिंडोरी मतदार संघात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आक्रोश पाहायला मिळाला. तर शांतीगिरी महाराज यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर पोलिसांनी केलेली कारवाई चर्चेत राहिली. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघात चुरस वाढली होती. परंतु मतदानाचा टक्का अपेक्षित वाढला नसल्याची स्थिती आहे.

Election
Loksabha Election 2024 : कोण निवडून येणार? आकडेमोडीत गुंतले कार्यकर्ते

नाशिक लोकसभेसाठी ३१ तर दिंडोरीसाठी १० उमेदवार रिंगणात होते. राजकीय प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर प्रचाराच्या सांगतेपर्यंतही वरिष्ठ नेत्यांनी प्रचारात रंगत आणली. मात्र उमेदवारांनी एकमेकांवर टीका टाळल्याचे दिसून आले. मात्र ही निवडणूक प्रतिष्ठेची झाल्याचे पाहायला मिळाले. उमेदवारांचे कार्यकर्ते मैदानात उतरले. मात्र अपेक्षित मतदानाचा टक्का वाढू शकलेला नाही. सायंकाळी ५ वाजेपर्यंत नाशिकमध्ये ५१.१६ टक्के तर दिंडोरीमध्ये ५७.०६ टक्के मतदान झाले.

Election
Shirur Lok Sabha Election : शिरूरमध्ये कांदा कोणाला रडविणार, कोणाला हसविणार?

नाशिक मतदार संघात शिवसेनेच्या ठाकरे गटाने ऐनवेळी बदललेला उमेदवार तर शिवसेना शिंदे गटाने लांबणीवर नेलेली खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी राज्यभर चर्चेत राहिली. त्यात शांतिगिरी महाराज यांचे उमेदवारीने राजकारण वातावरण ढवळून निघाले. सकाळी ७ पासून दुपारी १२ पर्यंत मतदान केंद्रांवर गर्दी दिसून आली. तर दुपारी १३ ते ४ पर्यंत तुलनेत कमी दिसून आली. यामध्ये दिवसभरात अनेक घडामोडी व कारवायांनी मतदानाचा दिवस गाजला.

दिंडोरी मतदार संघामध्ये ग्रामीण भागात मतदारांचा उत्साह दिसून आला. नाशिकच्या तुलनेत दिंडोरीमध्ये अधिक मतदान झाले.

दिवसभरातील घडामोडी

अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्या समर्थकांनी भगव्या रंगाचे कपडे परिधान केल्याने पोलिसांची हरकत, काही ठिकाणी घेतले ताब्यात.

नाशिकमध्ये मध्य विधानसभा मतदार संघात भद्रकाली परिसरात माजी आमदार वसंत गिते व भाजप आमदार देवयानी फरांदे आमनेसामने

ईव्हीएमसमोर हार घातल्याने शांतीगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल

दिंडोरी मतदार संघात डोंगरगाव येथे साखराबाई बबूराव आहेर या १०० वर्षांवरील आजींनी मतदान केंद्रावर येऊन केले मतदान

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com