MAGNET Project : ‘मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत ‘एबीडी’ शिष्टमंडळाचा दौरा

Horticulture : राज्यातील फलोत्पादन पिकांच्या मूल्यवर्धनासाठी लागवड ते निर्यातीसाठी ‘एडीबी’च्या अर्थसाह्याने राबविण्यात येत असलेल्या ‘मॅग्नेट’ प्रकल्पाच्या मूल्यमापन आणि कामकाज आढाव्यासाठी शिष्टमंडळाने दोन दिवस विविध प्रकल्पांना भेटी देऊन आढावा घेतला.
MAGNET Project
MAGNET ProjectAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘फळे व भाजीपाल्याच्या निर्यातीसाठी महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प महत्त्वाचा असून, प्रकल्प उभारणीदरम्यान आशियायी विकास बॅंकेचे (एडीबी) पर्यावरणीय व सामाजिक निकष पूर्तता होत आहे.

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रकल्प योग्य रीतीने कार्यान्वित होत असल्याचे समाधान आहे,’’ असे मत ‘एडीबी’चे वरिष्ठ संचालक क्युंगफेंग झॅंग यांच्यासह शिष्टमंडळाने व्यक्त केले.

राज्यातील फलोत्पादन पिकांच्या मूल्यवर्धनासाठी लागवड ते निर्यातीसाठी ‘एडीबी’च्या अर्थसाह्याने राबविण्यात येत असलेल्या ‘मॅग्नेट’ प्रकल्पाच्या मूल्यमापन आणि कामकाज आढाव्यासाठी शिष्टमंडळाने दोन दिवस विविध प्रकल्पांना भेटी देऊन आढावा घेतला. शिष्टमंडळामध्ये भारतातील मुख्यालयाच्या प्रमुख मिओ ओका, यास्मिन सिद्दीकी, ताकेशी युएडा, अलेक्सिया मायकेल्स, नारायण अय्यर, विकास गोयल, कृष्णन रौटेला, राघवेंद्र एन. यांचा समावेश होता. बैठकीला ‘मॅग्नेट’चे अध्यक्ष अनुपकुमार, प्रकल्प संचालक विनायक कोकरे आदी उपस्थित होते.

MAGNET Project
MAGNET Project : ‘मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत ४२.२१ कोटींचे अनुदान वितरित

अनुपकुमार यांनी महाराष्ट्राच्या फलोत्पादन मूल्यसाखळी विकासासाठी कार्यरत मॅग्नेट प्रकल्पाची प्रगती व भविष्यातील नियोजन याबाबत शिष्टमंडळास माहिती दिली. अनुपकुमार म्हणाले,‘‘फलोत्पादन क्षेत्र व उत्पादनामध्ये महाराष्ट्र देशातील अग्रेसर राज्य आहे. तसेच राज्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने फलोत्पादन क्षेत्राचा विकास ही महत्त्वाची बाब आहे. राज्यातील फलोत्पादन क्षेत्रातील कृषी व्यवसायाला चालना देण्याकरिता मॅग्नेट प्रकल्प महत्त्वाचे काम करत आहे.’’

MAGNET Project
Magnet Project : शेतकऱ्यांनी ‘मॅग्नेट’ प्रकल्पाचा लाभ घ्यावा : डागा

दरम्यान, शिष्टमंडळाने वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन (व्हॅमनिकॉम) संस्थेच भागधारकांसोबत चर्चा केली. या वेळी प्रकल्प अंमलबजावणी दरम्यान आलेले अनुभव, लाभार्थ्यांच्या सूचनांवर चर्चा करून प्रकल्पाच्या कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करावेत, अशी सूचना क्युंगफेंग झॅंग यांनी केली.

शिष्टमंडळाचे भेटीदरम्यान प्रकल्प संचालक विनायक कोकरे, अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव यांनी विविध माहितीचे सादरीकरण केले. प्रकल्पाचे अंमलबजावणी साह्य सल्लागार चेतन भक्कड हे उपस्थित होते.

‘मॅग्नेट’मध्ये या पिकांचा समावेश

डाळिंब, केळी, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची (हिरवी व लाल), आंबा, काजू, पडवळ, लिंबू व फुलपिके या फलोत्पादन पिकांचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com