Satara Violence : ‘व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस’वरून साताऱ्यात ठिणगी, जाळपोळीनंतर इंटरनेट सेवा बंद

Satara Internet Service : सातारा जिल्ह्यातील काही तरुणांनी महापुरुषांविषयी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला पोस्ट ठेवली होती. या पोस्टवरून पुसेसावळीत जमावाने वाहने, दुकाने पेटवून दिली. मालमत्तेची तोडफोड केली.
Satara violence
Satara violence Agrowon

Satara Riots : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावामध्ये ‘व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस’वरून दोन गटात वाद सुरू झालेला वाद हिंसक बनला आहे. महापुरुषांचे फोटो लावून वादग्रस्त मजकूर लिहिल्याच्या प्रकरणानंतर जमावाने रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास गावातील वाहने, दुकाने पेटवून दिली. मालमत्तेची तोडफोड केली. या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

Satara violence
Maratha Reservation : जालना लाठीचार्जच्या निषेधार्थ आज ठाणे बंद , 16 सप्टेंबरला मराठवाडा चक्क जामची हाक

खटाव तालुक्यातील पुसेसावळी या गावातील तरुणांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला महापुरुषांचे फोटो लावून वादग्रस्त मजकूर लिहिला होता. त्यामुळे दोन-तीन दिवसांपासून वातावरण तापले असताना रविवारी रात्री दोन गट आमने-सामनेही आले. त्यानंतर रविवारी रात्री हिंसेचा भडका उडाला. रात्रीच्या सुमारास हिंस्त्र जमावाने घरे, दुकाने यांना आग लावण्यास सुरुवात केली. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेनंतर जिल्ह्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच सकाळपासून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेखर यांनी इतर कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com