Minister Suresh Khade : सांगलीतील गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित नकोत

EL Nino : सद्यःस्थितीत पाऊस लांबला आहे. ‘एल निनो’चे संकट आले, तर जुलैअखेर पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा कोयना धरणात ठेवण्यात आला आहे.
Water Shortage
Water ShortageAgrowon
Published on
Updated on

Sangli News : सद्यःस्थितीत पाऊस लांबला आहे. ‘एल निनो’चे संकट आले, तर जुलैअखेर पुरेल एवढा पिण्याच्या पाण्याचा साठा कोयना धरणात ठेवण्यात आला आहे. माणसे आणि जनावरे यांच्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात आल्याने टप्प्याटप्प्याने उपसाबंदी करणे आवश्यक आहे.

सद्यःस्थितीत शेतीला पाण्याचा पुरवठा करणे अवघड आहे. जिल्ह्यात एकही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहता कामा नये, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिल्या.

Water Shortage
EL Nino Update : ‘एल निनो’च्या सावटामुळे पीक नियोजनाची कसरत

ताकारी, टेंभू, म्हैसाळ, आरफळ योजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्या वेळी ते बोलत होते.

अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह पाटील, उपजिल्हाधिकारी विजया पांगारकर, पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, म्हैसाळ-२ उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता सचिन पवार, टेंभू उपसा सिंचन-एकचे कार्यकारी अभियंता अभिनंदन हारुगडे, ताकारी उपसा सिंचन योजनेचे राजन डवरी, टेंभू उपसा सिंचन योजना-दोनचे उपविभागीय अभियंता सुशील गायकवाड व ताकारी-म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे उपविभागीय अभियंता अमित डवरी, ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता धर्मराज पेठकर उपस्थित होते.

पालकमंत्री खाडे म्हणाले, ‘‘जूनचा मध्यावधी संपला तरी पाऊस नाही. पाऊस आणखी काही दिवस लांबल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल. माणसे आणि जनावरांना पिण्याचे पाणी कमी पडणार नाही, पाण्यापासून एकही गाव वंचित राहणार नाही, याची दक्षता घेऊन यंत्रणांनी आवश्यक नियोजन करावे.’’

कोयना धरणात ११.७४, वारणा धरणात ११.२८ टीएमसी पाणीसाठा आहे. कोयनेतून सध्या १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. टेंभू योजनेचे नऊ पंप सुरू असून, १२ टीएमसी पाणी उचलले गेले आहे. ताकारी योजनेतून ४.८५ टीएमसी पाणी उचलले आहे. म्हैसाळ योजनेतून ७.२० टीएमसी पाणी उचलले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com