Kalu Dam: काळू धरण प्रकल्पाविरोधात संघर्ष

Dam Protest; काळू धरण प्रकल्पाच्या प्रस्तावित बांधकामामुळे मुरबाड तालुक्यातील बुडीत क्षेत्रातील गावांचे भविष्य धोक्यात आले आहे.
Kalu Dam
Kalu DamAgrowon
Published on
Updated on

Murbad News: काळू धरण प्रकल्पाच्या प्रस्तावित बांधकामामुळे मुरबाड तालुक्यातील बुडीत क्षेत्रातील गावांचे भविष्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुनर्वसन धोरणावर चर्चा करण्यासाठी मुरबाड तालुक्यात सरकारकडून विशेष ग्रामसभा आयोजित केल्या जात आहेत.

मात्र, तळेगाव येथे बुधवारी (ता. ६) दुपारी झालेल्या ग्रामसभेत आम्हाला काळू धरणच नको. या ग्रामसभा अनाठायी असून धरणाला ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शविला आहे.तालुक्यातील काळू नदीवर होणाऱ्या धरणामुळे बाधितांच्या पुनर्वसनासाठी खासगी जमिनीच्या भूसंपादन प्रस्तावाविषयी चर्चा करण्यासाठी बाधित क्षेत्रातील ग्रामपंचायतीतर्फे विशेष ग्रामसभा होत आहेत.

Kalu Dam
Kalu River : ‘काळू’वरील धरणाला विरोध

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, तळेगाव येथे बुडीत क्षेत्रातील नागरिकांची पुनर्वसन या विषयावर बुधवारी बैठक झाली. या बैठकीत काळू धरण हे परिसरातील लोकांवर लादण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत धरणाला विरोध कायम ठेवून यापुढे संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार उपस्थितांनी बोलून दाखवला.

Kalu Dam
Hatnur Dam : ...आतापर्यंत केवळ हतनूर सिंचन प्रकल्पातूनच विसर्ग सुरू

वेळ पडल्यास रास्ता रोको, धरणे आंदोलन करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे माजी उपसभापती भगवान भला म्हणाले. तर धरणाविरोधी ठराव करून एकमताने विरोध दर्शवण्याचे आवाहन विलास काका देशमुख यांनी केले. तळेगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा मंगळवारी (ता. १२) होणार आहे.

मात्र, काळू धरणग्रस्तांचा धरणाला विरोध कायम असून पुन्हा संघर्ष पुकारण्याचे ठरविले आहे. बैठकीला प्रवीण देशमुख, विनोद राऊत, बापू देशमुख, शशी देशमुख, संभाजी गोडांबे, अरुण चौधरी, गुलाबराव देशमुख, अरुण राऊत, रंगनाथ देशमुख, बाळकृष्ण पठारे, रघुनाथ ठाकरे उपस्थित होते.

प्रकल्पाविरोधात एल्गार

सामाजिक कार्यकर्ते हरिभाऊ राऊत यांनी, आम्हाला काळू धरणच नको आहे, तर मग पुनर्वसन किंवा भूसंपादनावर चर्चा कशासाठी? असा थेट सवाल ग्रामसभेत उपस्थित केला. धरणासंबंधी तांत्रिक बाबी अपूर्ण असताना विशेष ग्रामसभांचा अट्टाहास धरून सरकार अन्याय करत आहे.हा प्रयत्न सर्वांनी मिळून हाणून पाडण्याचा निर्धार करण्याचे आवाहन किसन आलम यांनी केले. आपल्या परिसराला देशोधडीला लावणारा हा प्रकल्प आहे, असे शिवराम हिलम यांनी स्पष्ट केले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com