Agricultural prices : पुढाऱ्यांना 'गावबंदी'चे लोण आता बुलढाण्यातही; सोनेवाडीत लागला प्रवेशबंदीचा फलक

Village Entry ban to political leaders : राज्यातील शेतकरी हा शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांकडून यावरून सरकारवर टीका देखील होत आहे. मात्र यावर सरकार, लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पुढाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. त्यावरून गावाच्या वेशीवर गावबंदी फलकच लावण्यात आला आहे.
Agricultural prices
Agricultural pricesAgrowon

Buldhana News : काही दिवसांपूर्वीच पीकविमा योजनेत फसवणूक झाल्यावरून जळगाव जिल्ह्यातील चिनावल (ता. रावेर) येथे पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली होती. तेथे पीकविमा योजनेत मदत न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा आमदार, खासदार- मंत्र्यांना देण्यात आला होता. त्याचप्रमाणे आता बुलढाण्यातही शेतकरी आक्रमक झाले असून त्यांच्याकडूनही शेतकऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे.

राज्यात सोयाबीन, कापूस, तुरीचा भाव हा सतत पडत आहे. भाव हे अर्ध्यावर आले आहेत. दुष्काळी, नापिकी, अतिवृष्टी, पिकविमा यांच्या नुसत्या बाता मारल्या जात आहेत. पण शेतकऱ्यांना सहकार्य केले जात नाही. त्यामुळे येथील सोनेवाडी येथील शेतकऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच काय तर त्यांनी गावाच्या प्रवेशद्वारावरच राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी असल्याचा फलक लावला आहे.

Agricultural prices
Nashik Latest News : शेतीमालाचे दर कोसळल्याने राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतमालास दुपट्ट हमीभाव देऊ अशी घोषणा केली होती. मात्र लागवडीचा खर्च देखील येथे मिळत नाही. तर भाववाढीची वाट ही आता धुसर दिसत आहे. त्यातच कापशीला देखील चांगले दिवस राहिलेले नसून भाव आणखीच खाली पडत चालला आहे.

Agricultural prices
Banana Crop Insurance : केळीला पीक विमा नाही, पुढाऱ्यांना गावबंदी व मतदानावर बहिष्कार

असे असताना मात्र शेतकऱ्यांची भावना समजुन घेण्यासाठी कोणताही राजकीय पक्ष, नेता पुढे येताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष द्यायला सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडे वेळ नाही. शेतकऱ्यांला कोणीही वाली नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यातूनच हा संताप राजकीय पुढाऱ्यांवर निघत आहे.

चिखली तालुक्यातील सोनेवाडी येथील शेतकरी, युवावर्ग यांनी पुढाऱ्यांना गावबंदीचा फलक लावला आहे. तसेच शेतकऱ्याच्या घामाचा दाम सरकार देता येत नसेल, तर या सरकारवर खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. त्यामुळे सरकार, पुढारी यांच्या विरोधात येथे गावबंदी जाहीर करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com