Indian Agriculture : देशाच्या विकास दरवाढीत कृषी क्षेत्राचे योगदान मोठे ः उपराष्ट्रपती

Latest Agriculture News : देशाच्या विकास दरवाढीत कृषिक्षेत्राचे मोठे योगदान आहे. हा विकासदर सातत्याने वाढता राहावा याकरिता कृषी क्षेत्रात नवनव्या प्रयोगांवर भर दिला पाहिजे.
Jagdeep Dhankad
Jagdeep DhankadAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : देशाच्या विकास दरवाढीत कृषिक्षेत्राचे मोठे योगदान आहे. हा विकासदर सातत्याने वाढता राहावा याकरिता कृषी क्षेत्रात नवनव्या प्रयोगांवर भर दिला पाहिजे. त्यासोबतच शेतकऱ्यांनी देखील आर्थिक सक्षमतेच्या उद्देशाने शेळी-मेंढी, कुक्‍कुटपालन व इतर पर्यायांचा विचार करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केले.

अविकानगर (राजस्थान) येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत असलेल्या मेंढी व लोकर संशोधन केंद्राला उपराष्ट्रपतींनी शुक्रवारी (ता. १५) भेट दिली. या भेटीप्रसंगी ते बोलत होते.

Jagdeep Dhankad
Agriculture Issue : शेतकऱ्यांपर्यंत समस्यांचे समाधान पोहोचविणे गरजेचे

या दौऱ्याच्या वेळी स्थानिक खासदार सुखबीर सिंह, आमदार कन्हय्यालाल चौधरी, राजस्थान पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, मेंढी व लोकर संशोधन केंद्राचे संचालक डॉ. अरुण तोमर यांची उपस्थिती होती. उपराष्ट्रपती पुढे म्हणाले, ‘‘पशुपालनाच्या पारंपरिक पद्धतीतही बदलाची गरज आहे.

Jagdeep Dhankad
Agricultural Inputs : निविष्ठा उत्पादक आणि विक्रेत्यांवर सुधारित कायद्याचा बडगा

नफ्याचे मार्जिन वाढविण्याकरिता शेतकऱ्यांनी या क्षेत्रातही नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब कसा वाढेल, याकरिता पुढे आले पाहिजे. कमी पशुखाद्यात आणि कमी कालावधीत वजन वाढणाऱ्या पशूंच्या संगोपनाकडे आता पशुपालकांनी लक्ष द्यावे.’’

या वेळी संस्थेचे संचालक डॉ. अरुण तोमर यांनी पशुपालन क्षेत्रातील तंत्रज्ञान विस्ताराला गती मिळावी याकरीता संस्था परिसरात केव्हीके, पशुपालकांना प्रशिक्षण देता यावे याकरीता अद्ययावत कौशल्य विकास केंद्र तसेच केंद्रीय पशुविज्ञान महाविद्यालय उभारणीला मान्यता मिळावी,’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com