Pollution Free Village : वासुद (अकोला) गाव प्रदूषणमुक्त करण्याचा ग्रामस्थांनी केला निर्धार

River Conservation : सांगोला तालुक्यातील वासुद (अकोला) गावाने नदीसंवर्धनाच्या कामात दिलेल्या योगदानानंतर आता गावकऱ्यांनी संपूर्ण गाव प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार केला आहे.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सांगोला तालुक्यातील वासुद (अकोला) गावाने नदीसंवर्धनाच्या कामात दिलेल्या योगदानानंतर आता गावकऱ्यांनी संपूर्ण गाव प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. गावकऱ्यांनी खास या विषयावर बोलावलेल्या बैठकीत सामूहिकपणे हा निर्णय घेतला.

या उपक्रमासाठी गावातील काही ज्येष्ठ नागरिक, वृक्षप्रेमी, डॉक्टर, नोकरी निमित्त परगावी असणारे तरुण, सेवानिवृत्त झालेले कर्मचारी व ग्रामपंचायत सदस्य इत्यादींनी पुढाकार घेतला आहे. या आधी गावकऱ्यांनी एकत्र येऊन २०२४ मध्ये गावठाण परिसरात पर्यावरणपूरक ४०० वृक्षाची लागवड केली.

ती सर्व झाडे चांगल्या प्रकारे संवर्धन करून गावठाण भाग व गावातील रस्त्याच्या दोन्ही बाजू हिरव्यागार व प्रसन्न केल्या आहेत. गावातील प्रत्येक नागरिक या सर्व झाडांची काळजी घेतात. तसेच चालू वर्षी पर्यावरण पूरक ४०० वृक्षाची लागवड करणार असल्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.

यासाठी निधीचे संकलन करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत माणगंगा भ्रमणसेवा संस्थेने आवाहन केल्याप्रमाणे बहुतांशी वृक्ष लागवड माणगंगा नदी काठावर करून वृक्ष संवर्धन स्पर्धेत भाग घेण्याचे ठरले. तसेच संपूर्ण गावातील नदीकाठावरील व परिसरातील पाणी वाचवण्यासाठी व गाव स्वच्छ रहावे, या उद्देशाने संपूर्ण गावठाण क्षेत्र, नदीपात्र चिलार मुक्त करण्याचा संकल्प सुदाम भोरे यांनी माडला.

Rural Development
Rural Development: समूहशक्तीतून साकारलेल्या ग्रामविकासाची कहाणी

सर्वांनी त्यास प्रोत्साहन देऊन या कामास लगेच सुरुवात करण्यात आली. ब्ल्यू जेट हेल्थकेअरचे संचालक व वासुदगावचे रहिवासी पोपट केदार यांनी त्यांच्या कंपनीच्या वतीने दहा हजार कापडी पिशव्यांचे वाटप करून गाव प्लॅस्टिकमुक्त करण्याचे आवाहन केले. तेथील गावकऱ्यानाही कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. गावातील सुज्ञ नागरिकांनी एकत्र येऊन या आधीच नद्या, निसर्गाचे पावित्र्य वाढवून गाव पर्यावरण संतुलित करण्यामध्ये सहभाग दिला आहे.

Rural Development
Rural Development: शेतकऱ्यांचे आणि गावाचे प्रश्न एकच का नसतात?

वृक्ष लागवड व संवर्धन स्पर्धेत माण नदीकाठच्या जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन नदीची नैसर्गिक शोभा वाढवावी, असे आवाहन माणगंगा भ्रमणसेवा संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ घोंगडे यांनी या वेळी केले.

या बैठकीत किशोर शास्त्री, सुदाम भोरे, बाळासाहेब सावंत, पोपट तात्या केदार, शिवाजीराव खटके, विष्णुपंत केदार, सचिन शिंदे, राजेंद्र केदार, शशिकांत केदार यांनी मार्गदर्शन केले. या बैठकीसाठी सिंगुबिरू खटके, रमेश सावंत, मधुकर पवार, नारायण आदलिंगे, रवी मराळ, विजयकुमार भोरे, दत्तात्रय शास्त्रे, चंद्रकांत सावंत, चंद्रकांत भोरे, सुनील सावंत, सुनील खटके आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com