
Yavatmal News: हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा ४६ वा स्मृतिदिन पुसद येथे सोमवारी (ता. १८) बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे प्रमुख अतिथी आहेत. राज्यमंत्री इंद्रनील नाईक या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहेत.
या कार्यक्रमात वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसदच्या वतीने महाराष्ट्रातील प्रयोगशील तेरा शेतकरी व कृषी शास्त्रज्ञांना वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांची घोषणा प्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी (ता. ११) करण्यात आली.
शाल श्रीफळ, स्मृती मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दुपारच्या सत्रात पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अनुभव कथन व ‘पोकरा’ टप्पा दोनवर मृदा विज्ञान विशेषज्ज्ञ विजय कोळेकर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष राज्यमंत्री इंद्रनील नाईक, कार्याध्यक्ष धनंजय सोनी यांनी केले आहे.
या सत्कारमूर्ती शेतकऱ्यांची नावे अशी
पश्चिम महाराष्ट्र : विनोद संपतराव तोडकर (कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली), जनार्दन संतराम अडसूळ (तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा).
उत्तर महाराष्ट्र : रमाकांत काशिनाथ बागूल (कुसुंबा, ता. जि. धुळे), वंदना प्रभाकर पाटील (पळासखेडा बु., ता. जामनेर, जि. जळगाव).
मराठवाडा : दादासाहेब दौलतराव शिंदे (सिंदोन, पो. आडगाव बु., ता. जि. छत्रपती संभाजीनगर), बालाजी दत्तराव महादवाड (डोंगरगाव, ता. मुदखेड, जि. नांदेड).
कोकण : अनिल हरिश्चंद्र शिगवण (कुंभवे, पो.साखरोळी, ता. दापोली, जि. रत्नागिरी), मिनेश मोहन गाडगीळ (गुळसुंदे, ता. पनवेल, जि. रायगड).
विदर्भ : कुंदन देवरावजी वाघमारे (गीताई नगर, पो. गोपुरी, ता. जि. वर्धा), नरसिंग थावरा जाधव (जवळा, ता. आर्णी, जि. यवतमाळ).
कृषी शास्त्रज्ञ : डॉ. दत्तात्रय साहेबराव थोरवे (वरिष्ठ संशोधन सहायक, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, ता. फलटण जि. सातारा)
प्रोत्साहनार्थ : कृषी शास्त्रज्ञ (ए.आय.) प्रा. नीलेश अशोक नलावडे (मुख्य कार्यकारी अधिकारी, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती)
समाज माध्यम शेतकरी मार्गदर्शक : सागर बापूसो कोपर्डेकर (बालिंगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.