Soybean Variety : सोयाबीन लागवडीसाठी वाण निवड

Soybean Farming : सोयाबीन लागवडीसाठी कृषी विद्यापीठांनी विविध गुणवैशिष्ट्ये असलेले वाण विकसित केले आहेत.
Soybean Farming
Soybean Farming Agrowon
Published on
Updated on

डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. अनिल राजगुरू

Soybean Cultivation : सोयाबीन लागवडीसाठी कृषी विद्यापीठांनी विविध गुणवैशिष्ट्ये असलेले वाण विकसित केले आहेत. लागवडीसाठी स्थानिक परिस्थितीनुसार कमी, मध्यम व उशिरा कालावधीत तयार होणारे, अवर्षणास प्रतिकारक्षम, कीड व रोगास प्रतिकारक, चांगले उत्पादन देणाऱ्या वाणाची निवड करावी.

आघारकर संशोधन संस्था, पुणे विकसित वाण

एमएसीएस १४६०

प्रसारण वर्ष : २०२१

परिपक्वता कालावधी : ९५ दिवस

वैशिष्ट्ये : चांगले उत्पादन देणारे वाण, कमी कालावधीत पक्व होणारा, दुष्काळसदृश परिस्थितीत चांगले उत्पादन देणारे वाण, कीड व रोगास कमी बळी पडते, यांत्रिक कापणीस योग्य.

हेक्टरी उत्पादन : २२ ते ३८ क्विंटल.

एमएसीएस ११८८

प्रसारण वर्ष : २०१२

परिपक्वता कालावधी : ११० दिवस

वैशिष्ट्ये : काढणीच्या वेळी शेंगा फुटत नाहीत, यांत्रिक कापणीस योग्य

हेक्टरी उत्पादन : २८ ते ३५ क्विंटल

Soybean Farming
Soybean Farming : सोयाबीनसाठी रुंद वरंबा सरी लागवड तंत्रज्ञान

एमएसीएस १४०७

प्रसारण वर्ष : २०२१

परिपक्वता कालावधी : १०४ दिवस

वैशिष्ट्ये : काढणीच्या वेळेस शेंगा फुटत नाहीत, खोडमाशी प्रतिरोधक

हेक्टरी उत्पादन : २० ते ३० क्विंटल.

एमएसीएस १५२०

प्रसारण वर्ष : २०२१

परिपक्वता कालावधी : १०० दिवस

वैशिष्ट्ये : यांत्रिक कापणीस योग्य, खोडमाशी प्रतिकारक्षम

हेक्टरी उत्पादन : २१ ते २९ क्विंटल

भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदोर (मध्यप्रदेश) येथून विकसित वाण ः

एनआरसी ३७ (अहिल्या-४)

प्रसारण वर्ष : २०१७

मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान या राज्यांत लागवडीसाठी शिफारस

परिपक्वता कालावधी : ९६ ते १०२ दिवस

वैशिष्ट्ये : चांगला उत्पादन देणारा वाण

हेक्टरी उत्पादन : ३५ ते ४० क्विंटल

एनआरसी १५७

प्रसारण वर्ष : २०२१-२२

परिपक्वता कालावधी : ९४ दिवस

वैशिष्ट्ये : उशिरा लागवडीसाठी (२० जुलैपर्यंत) शिफारशीत वाण

हेक्टरी उत्पादन : १६ ते २० क्विंटल

Soybean Farming
Soybean Varieties : सोयाबीन वाणांची गुणवैशिष्ट्ये

एनआरसी १३८ (इंदोर सोया १३८)

प्रसारण वर्ष : २०२१

परिपक्वता कालावधी : ९० ते ९४ दिवस

वैशिष्ट्ये : तांबेरा आणि पिवळा मोझॅक रोगास प्रतिकारक्षम

हेक्टरी उत्पादन : २५ ते ३० क्विंटल

जवाहरलाल नेहरू कृषी विश्व विद्यापीठ, जबलपूर (मध्य प्रदेश) येथून विकसित वाण

जेएस ३३५

प्रसारण वर्ष : १९९४

परिपक्वता कालावधी : ९५ ते १०० दिवस

वैशिष्ट्ये : मध्यम ते भारी जमिनीत लागवडीस योग्य, हळवा वाण, दाण्याचा रंग पिवळा, मध्यम आकाराचे दाणे, आंतरपिकास योग्य.

हेक्टरी उत्पादन : २५ ते २८ क्विंटल

जेएस २०९८

प्रसारण वर्ष : २०१७ ते १८

परिपक्वता कालावधी : ९५ ते ९८ दिवस

वैशिष्ट्ये : उंच वाढणारे असल्याने हार्वेस्टरने काढण्यास योग्य वाण.

हेक्टरी उत्पादन : २५ ते २८ क्विंटल

जेएस ९३-०५

प्रसारण वर्ष : २००२

परिपक्वता कालावधी : ८५ ते ९० दिवस

वैशिष्ट्ये : लवकर येणारे वाण, हलक्या व मध्यम जमिनीसाठी योग्य, न पडणारे व शेंगा न फुटणारे वाण.

हेक्टरी उत्पादन : २५ ते २८ क्विंटल

४) जेएस ९५-६०

परिपक्वता कालावधी : ८२ ते ८८ दिवस

वैशिष्ट्ये : जाड दाणा, चार दाण्याचा शेंगा असलेले तसेच दुष्काळसदृश परिस्थितीत चांगले उत्पादन देणारे वाण

हेक्टरी उत्पादन : २० ते २५ क्विंटल

डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९

(एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

डॉ. अनिल राजगुरू, ९४२१९५२३२४

(कृषी वनस्पतिशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com