Pune Rain : पुणे जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाची बारा दिवसांत १२७ मिलिमीटर पावसाची नोंद

Rain Update : वेल्हे तालुक्यात सर्वाधिक ११३ मिलिमीटर पाऊस
Monsoon Rain
Monsoon RainAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune Pre-Monsoon Rain : पुणे : जिल्ह्यात मागील बारा दिवसांपासून मॉन्सूनपूर्व जोरात सुरू आहे. काही ठिकाणी वादळी वारे व मेघगर्जनेसह पाऊस कोसळत आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ४१.१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यामध्ये वेल्हे तालुक्यात सर्वाधिक ११३ मिलिमीटर पाऊस पडला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

मॉन्सूनचा प्रवास सुरू झाल्यानंतर राज्यातील वातावरणात चांगलेच बदल झाले आहेत. जिल्ह्यात दहा जूनपासून पावसास सुरुवात झाली आहे. मंगळवारी (ता.२१)
सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ६.४ मिलिमीटर पाऊस पडला असून, पुरंदर, दौंड, भोर, वेल्हे, हवेली तालुक्यांत अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाई देण्याची मागणी करू लागले आहेत.

Monsoon Rain
Pune Rain : पुणे जिल्ह्यात मॉन्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी

पुरंदर तालुक्यातील वाल्हे (ता. पुरंदर) व परिसरात सोमवारी (ता.२०) सायंकाळी पाचनंतर अचानक जोरदार वादळी वाऱ्याने वाल्हे व परिसरातील अनेकांचे मोठे नुकसान केले. या वादळी वाऱ्यात माळवाडी व वाल्मिकनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्यांचे पत्रे उडून गेल्याने, तसेच माळवाडी शाळेचे गेट पडल्याने नुकसान झाले आहे. सुदैवाने शाळांना उन्हाळी सुट्टी असल्याने शाळेत विद्यार्थी व शिक्षक कर्मचारीवर्ग उपस्थित नव्हते. नाहीतर मोठा अनर्थ घडला असता अशी चर्चा उपस्थितांमध्ये होती.

Monsoon Rain
Rain Update : मंचरमध्ये ५४ मिलिमीटर पावसाची नोंद

दरम्यान, पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावर वाल्हे बस स्थानकाजवळ हनुमंत पवार यांच्या घरासमोरील झाडे विद्युत तारांवर पडल्याने तारांसह खांब पडले आहेत. दौंडमधील खुटबाव, नाथाचीवाडी, पिंपळगाव, यवत, लडकतवाडी, भरतगाव, एकेरीवाडी, बोरीएंदी, कासुर्डी गावांत वादळ वाऱ्यासह जोराचा पाऊस पडला. तालुक्यातील भरतगाव, हाकेवाडी येथे वादळी वाऱ्यामुळे घराच्या आडोशाला असलेल्या मेंढ्यांवर घराची भिंत कोसळून त्यामध्ये ३ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या, तर १० मेंढ्या जखमी झाल्या असल्याची घटना घडली आहे. एकेरीवाडी येथील वाल्मिक वाघोले यांच्या हाताशी आलेली एक एकर केळीची बाग वाऱ्यामुळे भुईसपाट झाली.
वेल्हे तालुक्यातील राजगड, तोरणा, पानशेत व अठरागाव मावळ भागात वादळी वारा व विजेच्या कडकटांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. अनेक ठिकाणी झाडे व विजेचे खांब कोसळले, काही ठिकाणी घरावरील छप्पर उडून गेली. तर, अनेक ठिकाणी फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, प्रामुख्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. विजेच्या खांबाच्या तारा पडल्याच्या घटना घडल्याने तालुक्यातील चाळीस ते पन्नास गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकरी वर्गाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

वेल्हे बुद्रुक येथील प्रसाद लायगुडे यांच्या घरावर मोठे झाड कोसळले. तर विकास गायके यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेले. सोमवारी (ता. २०) झालेल्या या मुसळधार पावसात कोणतीही जीवितहानी झाली नाही. तालुक्यातील अनेक गावांमध्ये विजेचे खांब कोसळले असून, विद्युत पुरवठा बंद झाला होता.

आंबा, फणस व जांभळाचे नुकसान
अचानक झालेल्या मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह व विजेच्या कडकडांटासह झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे फळपिकांचे नुकसान झाले. उन्हाळी पिके, आंबा, त्याची झालेली नवीन लागवड, फणस, करवंदे, जांभूळ, सीताफळ, अंजीर यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय अनेकांच्या घरांची छपरे उडाली आहेत.


पुणे जिल्ह्यात १० ते २१ एप्रिल या कालावधीत पडलेला तालुकानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)
तालुका --- पडलेला पाऊस

पुणे शहर -- ८३
हवेली --- ६०
मुळशी --- ३३.४
भोर --- ७५.६
मावळ --- ४७.३
वेल्हे --- ११३.०
जुन्नर --- १३.२
खेड --- ४५.८
आंबेगाव --३४.०
शिरूर --- २१.७
बारामती --- ३०.८
इंदापूर --- २२.८
दौंड --- ४३.०
पुरंदर --- ५७.७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com