Animal Vaccination : सांगलीतील सहा लाख जनावरांना ‘लाळ्या खुरकूत’चे लसीकरण

Vaccination Update : सांगली जिल्ह्यातील जनावरांना लाळ्या खुरकतचा प्रादुर्भाव हो नये यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे.
Animal Vaccination
Animal VaccinationAgrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यातील जनावरांना लाळ्या खुरकतचा प्रादुर्भाव हो नये यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. ६ लाख ८१ हजार १९० जनावरांना लाळ्या खुरकूतचे लसीकरण केले असून शेळ्यांना पीपीआरचे लसीकरणही केले आहे. जनावरांच्या लसीकरणाची मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिली.

Animal Vaccination
Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

जिल्ह्यात गायींची संख्या ३ लाख २४ हजार ७५६ तर म्हशींची संख्या ४ लाख ९३ हजार ९९८ अशी एकूण ८ लाख १८ हजार ७५४ जनावरे आहेत. दरवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान (एफ.एम.डी.) तोंडखुरी पायखुरी/लाळ्या खुरकूत या रोगाची लागण जनावरांना होऊ नये, यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून या रोग प्रतिबंधक लसीकरण केले जाते. मात्र, जिल्ह्यात ४० हजार लाळ्या खुरकतच्या लसी शिल्लक होत्या. दरम्यान, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शासनाकडून ६ लाख ९५ हजार ९०० लसी पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाल्या.

जानेवारीपासून पशुसंवर्धन विभागाने तालुकानिहाय लसींचा पुरवठा केला. त्यानंतर प्रत्येक गावात जनावरांना लसीकरणाची मोहीम सुरू केली. जिल्ह्यात ८ लाख १८ हजार ७५४ जनावरांपैकी ६ लाख ८१ हजार १९० जनावरांना लाळ्या खुरकूतचे लसीकरण करण्यात आले. आजअखेर ७२ हजार ८४८ गाई तर ८५ हजार ९७३ म्हशी, अशा एकूण १ लाख ५८ हजार ८२१ जनावरांना लसीकरण केले आहे. १ लाख ३७ हजार ५६४ जनावरांना लसीकरण करण्याचे काम सुरू आहे. उर्वरित जनावरांचे लसीकरण लवकरच पूर्ण केले जाईल. जिल्ह्यात शेळ्या मेंढ्यांची ५ लाख ८४ हजार ८७९ संख्या आहे. शेळ्या-मेंढ्यांना लसीकरण मोहीम राबवली आहे.

Animal Vaccination
Animal Vaccination : खानदेशात लाळ्या खुरकूत लसीकरण संथ
जिल्ह्यातील जनावरांना ‘लाळ्या खुरकूत’ची लसीकरण मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. तसेच तसेच शेळ्या-मेंढ्यांनाही पीपीआरचे (पेस्टी-डेस पेटीट्‌स रुमीनन्ट्स) लसीकरणही सुरू केले आहे. लसींचा साठा उपलब्ध असून सर्व जनावरांचे लकवर लसीकरण केले जाईल.
डॉ. अजय थोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, मिरज (सांगली)

तालुकानिहाय जनावरे आणि लसीकरण

तालुका जनावरांची संख्या लसीकरण झालेली जनावरे

मिरज ९९७२३ ८३८२६

कवठेमहांकाळ ७३२८६ ६४६४७

शिराळा ७२३९४ ६१३५५

वाळवा १२३३१० ८४६४६

खानापूर ५८२३७ ४९४५७

जत १४२९५८ १३५०८०

तासगाव ८३३३४ ६८७०९

पलूस ५५५३९ ३८७५५

आटपाडी ५४४९० ४६६९२

कडेगाव ५५४८३ ४८०२३

एकूण ८१८७५४ ६८११९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com