Sangli Animal Husbandry Department : १ लाख ५८ हजार ८२१ जनावरांना लाळखुरकतीचे लसीकरण

Sangli : सांगली जिल्ह्यातील जनावरांना लाळ खुरकतचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे.
Sangli Animal Husbandry Department
Sangli Animal Husbandry Departmentagrowon
Published on
Updated on

Vaccination Animal : सांगली जिल्ह्यातील जनावरांना लाळ खुरकतचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. आजअखेर १ लाख ५८ हजार ८२१ जनावरांना लसीकरण केले आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिली.

सांगली जिल्ह्यात गायींची संख्या ३ लाख २४ हजार ७५६ तर म्हशींची ४ लाख ९३ हजार ९९८ अशी ८ लाख १८ हजार ७५४ जनावरांची संख्या आहे. दरवर्षी प्रतिवर्षी ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान (एफएमडी) तोंडखुरी पायखुरी/ लाळ खुरकत या रोगाची लागण जनावरांना होऊ नये, यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून या रोगाचे लसीकरण केले जाते.

मात्र, जिल्ह्यात ४० हजार लाळ खुरकतच्या लसी शिल्लक होत्या. पशुसंवर्धन विभागाने कारखाना व जिल्ह्याच्या सीमेवरील १२ हजार जनावरांना लसीकरण केले आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शासनाकडून ६ लाख ९५ हजार ९०० लसी पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाल्या. प्रत्येक तालुक्याच्या मागणीनुसार लसींचा पुरवठा उपलब्ध करुन दिला आहे.

प्रत्येक गावोगावात जनावरांना लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. आजअखेर ७२ हजार ८४८ गायी तर ८५ हजार ९७३ म्हशी असे १ लाख ५८ हजार ८२१ जनावरांना लसीकरण केले आहे. उर्वरित जनावरांचे लसीकरण लवकरच पूर्ण केले जाणार आहे. जिल्ह्यात शेळ्या मेंढ्यांची संख्या ५ लाख ८४ हजार ८०० इतकी असून १७ हजार ८२५ शेळ्या मेंढ्यांना पीपीआरचे लसीकरणही केले आहे.

Sangli Animal Husbandry Department
Krishna River Sangli : कृष्णा नदी पुन्हा एकदा कोरडी, शेतीसह नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

जिल्ह्यातील एकूण पशुधन

गाय - ३ लाख २४ हजार ७५६

म्हैस - ४ लाख ९३ हजार ९९८

शेळी - ४ लाख ५४ हजार १२५

मेंढी - १ लाख ३० हजार ७५४

जिल्ह्यातील जनावरांना 'लाळ खुरकत' ची लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. तसेच शेळ्या मेंढ्यांनाही पीपीआर (पेस्टी-डेस पेटीटस रुमीनन्ट्स) चे लसीकरणही सुरू केले आहे. सर्व जनावरांना लवकर लसीकरण पूर्ण केले जाईल.

- डॉ. अजय थोरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com