Sangli News : ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात जनावरांच्यात आढळणाऱ्या तोंडखुरी पायखुरी (एफ.एम.डी.) आजारावरील प्रतिबंधक उपाय म्हणून केले जाणारे लसीकरण सांगली जिल्ह्यात ६ लाख ५७ हजार ६१० (८२ टक्के) जनावरांना करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली.
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी शेतीस जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करीत आहेत. प्रत्येकाच्या घरी दोनच्या पटीत दुधाळ जनावरांची संख्या आहे. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील काही तालुक्यांमधील गावांत या आजाराने थैमान घातले होते. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. हा संसर्गजन्य आजार आहे. जनावरांच्या लाळेतून याचा प्रसार होतो.
प्रत्येक वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान (एफ.एम.डी.) तोंडखुरी पायखुरी/लाळ्या खुरकूत या रोगाची लागण जनावरांना होऊ नये, म्हणून प्रतिबंधक उपाय म्हणून या रोगाचे लसीकरण केले जाते. सुरुवातीस ताप येणे, तोंडाला पायाला जखमा होणे, अशी लक्षणे दिसतात. यात दुधाळ जनावरांना मोठा फटका बसतो. दूध उत्पादन घटते.
गळीत हंगाम सुरू होताच परजिल्ह्यांतील जनावरे ऊसतोडणी मजुरांसमवेत सर्वत्र ऊसपट्ट्यात येतात. ऊसतोडणी मजूर बीड, लातूर, कर्नाटक राज्यांतील काही गावांतून येतात. त्यामुळे या रोगाचा प्रसार होण्याचा धोका नाकारता येणार नाही.
लसीकरण केलेल्या जनावरांची संख्या : ६ लाख ५६ हजार ४१६
लसीकरण न केलेल्या जनावरांची संख्या : १ लाख ६१ हजार
जिल्ह्यातील पशुधन संख्या
गाय वर्ग ३ लाख २१ हजार ७५६
म्हैस वर्ग ४ लाख ९६ हजार ९९८
एकूण पशुधन ८ लाख १८ हजार ७५४
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.