Agriculture Department : ‘कृषी’च्या सहा कंत्राटी वाहनचालकांना मानधन मिळेना

Latest Agriculture News : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत कृषी विभागाकडे शासनाने बाह्य सेवा पुरवठादार संस्थेकडून सहा कंत्राटी वाहनचालकाची भरती केली. परंतु या संस्थेने मागील चार महिन्यांपासून वाहनचालकांना मानधन दिलेले नाही.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Nanded News : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत कृषी विभागाकडे शासनाने बाह्य सेवा पुरवठादार संस्थेकडून सहा कंत्राटी वाहनचालकाची भरती केली. परंतु या संस्थेने मागील चार महिन्यांपासून वाहनचालकांना मानधन दिलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ‘‘या संस्थेला कृषीमधीलच वरिष्ठांचे अभय असल्याने काम करा नाही तर सोडून जा’’ असा दम भरला जात असल्याची माहिती सूत्राने दिली.

जिल्ह्याचा भलामोठा विस्तार असलेल्या नांदेडला सोळा तालुका कृषी अधिकारी, तीन उपविभागीय कृषी अधिकारी, एक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, एक प्रकल्प संचालक (आत्मा), एक कृषी उपसंचालक असे २२ अधिकारी कार्यरत आहेत. यासाठी या वाहनचालकांची २२ पदे मंजूर आहेत. परंतु सध्या कृषी विभागाकडे १२ वाहने, तर केवळ चार वाहनचालक पदे भरलेली आहेत.

Agriculture Department
Agriculture Department : ‘कृषी’चा निधी विनावापर ठेवल्यास होणार कारवाई

परभणी येथील दि महात्मा फुले मल्टी सर्व्हिसेस या बाह्य सेवा पुरवठादार संस्थेकडून सहा वाहनचालकांची पदे भरण्यात आली. यात शिवहार केलासे, ज्ञानेश्‍वर केंद्रे, किरण कावळे, नितीन एकलारे, अंबादास गोखडे, अशोक बागनपल्ले यांचा समावेश आहे. हे वाहनचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासह काही तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे कार्यरत आहेत.

Agriculture Department
Agriculture Department : 'टीएसएफ' बनली ‘पांढरा हत्ती’

त्यांना १४ हजार ७३६ रुपये प्रतिमहिना एकत्रित मानधन मंजूर आहे. हे मानधन कृषी आयुक्तालयाकडून विभागीय सहसंचालकांना देण्यात येते. त्यांच्याकडून संबंधित संस्थेला पैसे दिले जातात. परंतु या वाहन चालकांना सेवा पुरवठादार संस्था मागील चार महिन्यांपासून मानधन देत नसल्याची स्थिती आहे.

संस्थेकडे मानधनाची मागणी केली असता काम करायचे तर करा अन्यथा सोडून जा, असा दम भरला जात असल्याची माहिती एका वाहनचालकाने दिली. या कंत्राटी वाहनचालकांना १४ हजार ७३६ रुपये मंजूर मानधन आहे. परंतु यातून ‘पीएफ’च्या नावाखाली ३ हजार ६०० रुपये कपात करून ११ हजार ४०० रुपये हाती पडतात, अशी माहिती समोर आली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याच्या गाडीवर चालक म्हणून कार्यरत आहे. मला मागील जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरचे मानधन मिळाले नाही. उपाशीपोटी कसे काम करणार, घर चालवणे कठीण झाले आहे.
- शिवहार केलासे, कंत्राटी वाहनचालक, नांदेड
कृषी विभागाकडून बजेट मिळाले नसल्यामुळे वाहनचालकांचे मानधन थकित आहे. बजेट उपलब्ध होताच त्यांना मानधन देण्यात येईल.
- विजयकुमार काळे, सेवा पुरवठादार, परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com