Water Stock In Marathwada : मराठवाड्यातील सर्वच प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ३४ टक्क्यांवर

Water Shortage : मराठवाड्यातील सर्व ८७७ लघु मध्यम मोठ्या प्रकल्पांसह नद्यांवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ३४ टक्क्यांवर आला आहे.
Water Stock
Water Stock Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील सर्व ८७७ लघु मध्यम मोठ्या प्रकल्पांसह नद्यांवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ३४ टक्क्यांवर आला आहे.

सर्वाधिक संख्येने असलेल्या लघु प्रकल्पात केवळ १४ टक्के तर मध्यम प्रकल्पात २५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठाही ४५ टक्क्यांच्या आत आला आहे.

जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील ७५ माध्यम प्रकल्पात २५ टक्के, ७४९ लघु प्रकल्पात १४ टक्के, मोठ्या ११ प्रकल्पात ४२ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात ३८ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेना या तीन नद्यांवरील २७ बंधाऱ्यात ३७ टक्के उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे.

११ मोठ्या प्रकल्पांपैकी जायकवाडीमध्ये ४० टक्के येलदरीत ५८, सिद्धेश्वरमध्ये ३२, माजलगावमध्ये २७, मांजरामध्ये ३२, ऊर्ध्व पेनगंगामध्ये ५० टक्के, निम्न तेरणामध्ये ४३, निम्न मनारमध्ये ३६, विष्णुपुरीत ५९, निम्न दुधनांमध्ये ३४, तर सीना कोळेगाव प्रकल्पात केवळ १८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

Water Stock
Dimbhe Dam Water : डिंभे धरणाचे पाणी पळविले तर आम्ही तुरुंगांत जाऊ

७५ माध्यम प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पात २४ टक्के जालनामधील ७ प्रकल्पात २९ टक्के, बीडमधील १६ प्रकल्पात २९ टक्के, लातूरमधील ८ प्रकल्पात २७, धाराशिवमधील १७ प्रकल्पात २३, नांदेडमधील नऊ प्रकल्पात २७, तर परभणीमधील दोन प्रकल्पात केवळ २९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

७४९ लघु प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९७ प्रकल्पात ११ टक्के, जालनामधील ५७ प्रकल्पात १०, बीडमधील १२६ प्रकल्पात १५, लातूरमधील १३४ प्रकल्पात २०, उस्मानाबादमधील २०६ प्रकल्पात १२, नांदेडमधील ८० प्रकल्पात २२, परभणीमधील २२ प्रकल्पात १३ तर हिंगोली जिल्ह्यातील २७ लघु प्रकल्पात सर्वात कमी केवळ ५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली.

९ मध्यम तर २५८ लघु प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली

मराठवाड्यातील ७५ माध्यम प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगर व बीडमधील प्रत्येकी ३ जालना, धाराशिव व नांदेडमधील प्रत्येकी एक मिळून नऊ मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

दुसरीकडे ७४९ लघु प्रकल्पांपैकी तब्बल २५८ लघु प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ४१, जालनामधील ३५, बीडमधील ५१, लातूरमधील १७, धाराशिवमधील ५७, नांदेडमधील २९, परभणीमधील १२ तर हिंगोलीतील १६ लघु प्रकल्पांचा समावेश आहे.

Water Stock
Jalgaon Water Shortage : जळगाव जिल्ह्यात अठरा गावांत टँकर

२८ लघु प्रकल्प पडले कोरडे

मराठवाड्यातील ७४९ लघु प्रकल्पांपैकी २८ लघु प्रकल्प कोरडे पडले आहेत. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील ५, बीडमधील १० तर धाराशिवमधील सर्वाधिक १३ लघु प्रकल्पांचा समावेश आहे.

मराठवाड्यातील एकूण लघु प्रकल्पांपैकी ३२८ लघु प्रकल्पात २५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असून ११५ लघु प्रकल्पात २५ ते ५० टक्के दरम्यान, १६ प्रकल्पात ५० ते ७५ टक्केदरम्यान तर केवळ चार प्रकल्पात ७५ टक्कापेक्षा जास्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com