Dimbhe Dam Water : डिंभे धरणाचे पाणी पळविले तर आम्ही तुरुंगांत जाऊ

Dimbhe Dam : दिलीप वळसे पाटील ः राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता बैठक
Dimbhe Dam
Dimbhe DamAgrowon
Published on
Updated on

Dilip Walse Patil : मंचर, जि. पुणे ः ‘‘आंबेगाव, जुन्नर व शिरूर हे तालुके एकेकाळी दुष्काळी म्हणून ओळखले जात होते. आमच्या जुन्या पिढ्यांनी फार यातना भोगलेल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेऊन डिंभे धरणाचे (Dimbhe Dam) काम मार्गी लावले.

शेतकरी वर्गाला सुगीचे दिवस आले असतानाच जाणीवपूर्वक डिंभे धरणाचे पाणी (Dimbhe Dam Water) पळविण्याचा प्रयत्न कोणी केल्यास माझ्यासह जुन्नरचे आमदार अतुल बेनके सर्वात प्रथम तुरुंगात जातील,’’ असा इशारा राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केला.

शुक्रवारी (ता.२६) राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत वळसे पाटील बोलत होते. यावेळी अतुल बेनके, आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे, विवेक वळसे पाटील, बाळासाहेब बेंडे, ॲड. प्रदीप वळसे पाटील, वसंतराव भालेराव, सचिन पानसरे, शिवाजीराव ढोबळे, गणपतराव इंदोरे, सुभाषराव मोरमारे, सुषमा शिंदे, संजय गवारी, नीलेश थोरात, रत्ना गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Dimbhe Dam
Dimbhe Dam : रब्बीसाठी डिंभे धरणातून उजव्या कालव्याला पाणी

वळसे पाटील म्हणाले, ‘‘डिंभे धरणाच्या भूसंपादनासाठी आदिवासी बांधवांनी जमिनी उपलब्ध करून दिल्या आहेत. घोड, मीना, कुकडी नदीवर सुमारे ६५ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत.

हे बंधारे सातत्याने भरून घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला. परंतु आत्ताच्या सरकारने इथून पाणी पळवण्याचा विचार चालवलेला आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. यासाठी सर्वांनी सावध राहणे गरजेचे आहे.

मी व आमदार बेनके या लढ्यामध्ये अग्रभागी असणार आहोत. त्यासाठी होणाऱ्या लढ्यात सर्व शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे अन्यथा आपल्या वाट्याचे पाणी पळविले जाईल.’’


‘‘आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यांतील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी पळवणाऱ्याच्या विरोधात गावोगावी शेतकरी वर्गात जनजागृती करण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी करावे,’’ असे आवाहन आमदार बेनके यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com