Krushisamarat : सुख समृद्धी येई घरा, कृषिसम्राटची उत्पादने वापरा

Plant Protection : माणसाची दुर्दम्य इच्छाशक्ती, दूरदृष्टिकोन आणि सकारात्मकता आपल्यासोबतच कुटुंब आणि समाज यांना उभे करते. याचे उदाहरण म्हणजे कृषिसम्राट आणि ग्रीनस्टार ग्रुप ऑप कंपनीजचे कार्यकारी संचालक बाळासाहेब सूर्यवंशी होय.
Pesticides
Pesticides Agrowon
Published on
Updated on

Krushisamarat Products : माणसाची दुर्दम्य इच्छाशक्ती, दूरदृष्टिकोन आणि सकारात्मकता आपल्यासोबतच कुटुंब आणि समाज यांना उभे करते. याचे उदाहरण म्हणजे कृषिसम्राट आणि ग्रीनस्टार ग्रुप ऑप कंपनीजचे कार्यकारी संचालक बाळासाहेब सूर्यवंशी होय.

नां द्रे (ता. पाचोरा  जि. जळगाव) येथे शेतकरी कुटुंबाने १९९६ मध्ये शेतीसाठी उपयुक्त निविष्ठांचा कारखाना लक्ष्मी अॅग्रो केमिकल्स नावाने सुरू केला. यातूनच नावीन्यता, विश्‍वासपात्र व ग्राहक देवो भव: या त्रीसूत्रांची जोपासना करीत कृषिसम्राट उत्पादनांची यशस्वी वाटचाल सुरु आहे. सुरुवातीला पाच उत्पादनांपासून सुरुवात केलेल्या लक्ष्मी अॅग्रो केमिकल्स (लक्ष्मी केमिकल्स प्रा.लि.) कंपनीची आता शंभरपेक्षा जास्त उत्पादने आहेत.

कृषी क्षेत्रातील दांडगा अनुभव असलेले स्वर्गीय कै. अण्णासाहेब जयराम काळू पाटील यांनी  या कारखान्याची स्थापना केली. त्यानंतर सूर्यवंशी परिवाराने सर्वच क्षेत्रांत यशस्वीपणे वाटचाल करून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी त्यांच्या प्रगतीत काही प्रमाणात हातभार लावण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला.
 सध्या कृषी क्षेत्रात क्रांतिकारक बदल होत आहेत. या बदलांना कृषिसम्राटदेखील हातभार लावण्याचा प्रयत्न करीत आहेत. कृषिसम्राटच्या संचालक मंडळात तरुण संचालकांचा सहभाग वाढला आहे. भविष्याचा वेध घेणाऱ्या या संचालकांच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करुन उत्पादनवाढीसाठी प्रयत्न होत आहेत.
माणसाची दुर्दम्य इच्छाशक्ती, दूरदृष्टिकोन आणि सकारात्मकता आपल्यासोबतच कुटुंब आणि समाज यांना उभे करते. याचे उदाहरण म्हणजे कृषिसम्राट आणि ग्रीनस्टार ग्रुप ऑप कंपनीजचे कार्यकारी संचालक बाळासाहेब सूर्यवंशी होय. शासकीय नोकरी सोडून वयाच्या ४० व्या वर्षी व्यवसाय सुरू करणे हा धाडसी निर्णय होता. यामुळे शेकडो लोकांना काम मिळाले. तसेच कृषी केंद्र सुरू करून अनेक उद्योजक तयार झाले .
कृषिसम्राटच का ?

Pesticides
Kolhapur News : सुख कळले, मन जुळले

दृढ ऋणानुबंध, शेतकऱ्यांचा विश्‍वास, दर्जेदार शेती निविष्ठा,विविध उत्पादने, योग्य दर व वेगवान सेवा यामुळे कृषिसम्राट ब्रॅण्ड महाराष्ट्रात लोकप्रिय झाला. या मुल्यांचा आदर करून जोपासना केल्यामुळे उद्योगास २७ वर्षे झाली आहेत. या उद्योग समूहाची उत्पादने शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहेत.
दर्जेदार उत्पादने
 विविध भागांतील पिकांसाठी क़ृषिसम्राटने शेतकऱ्यांची गरज ओळखून उत्पादनांची निर्मिती केली. या उद्योग समूहाची कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, विद्राव्य खते, सेंद्रिय उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. शेतीसाठी आवश्यक असलेल्या जास्तीत जास्त उत्पादनांची मोठी शृंखला लक्ष्मी केमिकल्स प्रा.लि.कडे उपलब्ध आहे.
उत्पादनांचा प्रसार
काळानुरूप कृषी क्षेत्रात झालेल्या संशोधनाप्रमाणे शासनाने वेळोवेळी अनेक उत्पादनांना बाजारात विक्रीसाठी परवानगी दिली आहे. नवनवीन उत्पादने आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य कृषिसम्राटकडून विविध माध्यमांमार्फत करण्यात येते. त्यामुळे आधुनिक पद्धतीचा अवलंब करुन शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली आहे.
आई तुळजाभवानी मंदिर
परिसरातील व आसपासच्या जिल्ह्यांतील भक्तांची सोय व्हावी या उद्देशाने फेब्रुवारी २०१९ मध्ये नांद्रे येथे लक्ष्मी अॅग्रो केमिकल्सच्या जागेत आई तुळजा भवानी मंदिराची कृषिसम्राट परिवारातर्फे स्थापना करण्यात आली. नानासाहेब सूर्यवंशी यांच्या कल्पकतेने या भव्य मंदिराची उभारणी झाली. लाखो भाविकांचे कुलदैवत, ५५ फूट उंच मंदिर, अखंड ज्योत ही या मंदिराची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. अल्पावधीतच अासपासच्या जिल्ह्यांतील भाविकांमध्ये हे मंदिर लोकप्रिय झाले. खर्चाची बचत आणि सहजसुलभ देवीदर्शनामुळे भक्तगण समाधान व्यक्त करतात.

Pesticides
खूप खरेदी म्हणजे सुख असतं का?

लोकप्रिय उत्पादने
 कीटकनाशके ः अॅक्टर, सिंघम-८०, क्राउन ५०५, मोनो सम्राट, प्राइम, प्रोफेनोसम्राट, रॉकेट, फायटर+, अलर्ट, सूर्या नीम
 बुरशीनाशके ः  सुप्रिम, टिल, कॉन्टॅक्ट+, सम्राट एम-४५, अॅग्रोस्टीन, कर्ब
 तणनाशके  ः प्राम्प्ट, ग्लायकिल, पेंडीसम्राट, ग्लायकिल-७१
 संजीवके (PGR) ः  गोल्ड पॉवर+, क्रेझ, ग्रो फास्ट, ह्यमार्क G, रिवार्ड, सुपर पॉवर, मॅट्रिक्स, सुपरगोल्ड, स्टॉर्म, कॅलफ्टर्

सामाजिक कार्य
कृषिसम्राट आणि ग्रीनस्टार ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम कृषिसम्राट फाउंडेशनमार्फत राबविण्यात येतात. वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्यवाटप, गावकऱ्यांच्या सोईसाठी मोफत शवपेटी, आरोग्य शिबिराचे आयोजन, जनजागृतीसाठी विविध व्याख्याने इत्यादी उपक्रम राबविण्यात येतात. त्यामुळे समाजातील गरजू घटकांना मदत होते.

ठिबक उत्पादनाची सुरुवात
काळाची गरज ओळखून सूर्यवंशी परिवाराने शेती निविष्ठांच्या बरोबरीने पाणी बचतीसाठी ठिबक उत्पादने बाजारात आणली. ग्रीनस्टार ब्रॅण्डमध्ये आयएसआय, नॉन आयएसआय फ्लॅट ड्रीप, क्लीओन नावाने पीव्हीसी पाइप आणि कृषीटॉप नावाने आयएसआय, नॉन आयएसआय हायड्रोगोल ड्रीप बाजारात आणले. पाण्याचे महत्व ओळखून सिंचनासाठी लागणाऱ्या उत्पादनांची निर्मिती केली. या उत्पादनांच्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com