खूप खरेदी म्हणजे सुख असतं का?

टीव्हीवरच्या चमकदार जाहिराती पाहिल्यावर त्याच्या मोहात पडायला होतं. त्यांच्या जाळ्यात अडकू नये यासाठी मनाची चांगली कसरत करावी लागते.
Mashagat article
Mashagat article Agrowon
Published on
Updated on

अजिंक्य कुलकर्णी

------------

टीव्हीवरच्या चमकदार जाहिराती पाहिल्यावर त्याच्या मोहात पडायला होतं. त्यांच्या जाळ्यात अडकू नये यासाठी मनाची चांगली कसरत करावी लागते. या जाहिरातींची उपशीर्षके ठरवण्यामागे या जाहिरात कंपन्यांची एक मानसिकता असते. ते या उपशीर्षकातून आपल्या पुरुषार्थालाच आव्हान करतात. आणि आपण याच आव्हानाला बळी पडतो. मग काही वर्षांनी याच कंपन्या आपल्या अगोदर कबूल केलेल्या गोष्टींपासून बदलून पडतात. आपणही त्याचा फार विचार करत नाही. कोलगेटचं उदाहरण पाहू. काही वर्षांपूर्वी हीच कंपनी जाहिरातीत दाखवीत असे, की आपण मीठ, काळं दंतमंजन, दात घासण्यासाठी का वापरतो? आणि आता हेच आपल्याला विचारतात, ‘आपकी टूथपेस्ट मे नमक है?’ नव्वदच्या दशकानंतर आपण खुली बाजारपेठ, आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं. त्यामुळे कॉर्पोरेट कंपन्यांसाठी जग हे एक मोठी बाजारपेठ झाली. तेव्हापासून या कंपन्यांनी ग्राहकांच्या खरेदीला नवनवे आयाम देणं सुरू केलं. आपले व्यापारी चिन्हे (लोगो) ग्राहकांच्या समोर सतत कशाप्रकारे येत राहतील हे बघितले. त्यासाठी आक्रमक जाहिरातींची निर्मिती केली जाऊ लागली. त्या जाहिरातींमधून आपल्या पुरुषार्थाला आव्हान दिले जाऊ लागले. अमूक एक पावडर तोंडाला लावली तरच गोरं होतं. अमूक एक सेंट लावला तरच मुली आकर्षित होतात. सिगारेट ओढली, अमूक एक पानमसाला खाल्ला तरच तुम्ही मर्द (!).

मग आपण मध्यमवर्गीय लोक ज्यांच्या हातात नुकताच पैसा आला होता. ते सुखाच्या शोधात होते. फ्रॉइड म्हणतो तसं ‘सुखप्राप्ती हेच जीवनाचं अंतिम ध्येय असतं.’ या गोष्टीला जाहिराततज्ज्ञांनी ‘सुख = खरेदी व खरेदी = सुख’ असं समीकरणच बनवलं गेलं. जो जे वांच्छिल तो ते घेवो. म्हणत दाता आणि घेता हे एकाच वेळी ‘सुखी’ होत आहेत. या आक्रमक जाहिराती, तसेच वस्तू घरपोच करणाऱ्या ऑनलाइन कंपन्या या सोयींमुळे खूप खरेदी म्हणजेच सुख असं समीकरण घट्ट होऊ पाहत आहेत. व्हॅन्स पॅकार्ड यांच्याप्रमाणेही आपणही आपल्या स्वतःला काही प्रश्‍न विचारले पाहिजेत. ‘पैशाच्या बळावर कोणती मूल्ये रुजवत आहोत आपण?’ जगाला उपभोक्तावादी बनवले म्हणजेच सुख समजताहेत ही मंडळी. जगाला उपभोक्तावादी बनवणे म्हणजे सुख समजायचं का आपण? प्रभावशाली व्यक्तींनी साम्राज्याची केलेली ही फसवणूकच आहे. हे अनैतिक आहे. खूप खरेदी म्हणजे सुख का, याचा गांभीर्याने विचार करायला हवा. आपण या उटोपियातून बाहेर पडले पाहिजे. आपल्याला समन्वय साधता आला पाहिजे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com