Agriculture Produce : शेतीमालाला बाजारपेठ मिळवून देण्यात शेतकरी कंपन्यांचे योगदान

Nitin Gadkari : वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनी महासंघ तसेच कांचनी फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांच्या संयुक्‍त सहकार्याने शुक्रवारी (ता. ९) वरोरा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात नितीन गडकरी बोलत होते.
Nitin Gadkari
Nitin GadkariAgrowon
Published on
Updated on

Chandrapur News : प्रामाणिक शेतकऱ्यांना नेतृत्व देत शेतकरी उत्पादक कंपन्यांची उभारणी झाल्यास याद्वारे मध्यस्थांची साखळी कमी होईल. यातून शेतीमालाला चांगला दर मिळण्यास आणि निर्यात वाढीस हातभार लागेल, असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्‍त केला.

वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनी महासंघ तसेच कांचनी फार्मर प्रोड्यूसर कंपनी यांच्या संयुक्‍त सहकार्याने शुक्रवारी (ता. ९) वरोरा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. गडकरी म्हणाले, की चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांतील ५२ शेतकरी कंपन्या तसेच ४५ हजार शेतकरी सभासद महासंघाशी जुळले आहेत.

Nitin Gadkari
Agriculture Produce : शेतीमाल विक्रीस मॉलमध्ये जागा देणार : पालकमंत्री देसाई

या वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघाकडून शेतकरी कंपन्यांच्या उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळेच शेतकरी कंपन्यांच्या उद्योगाच्या बाबतीत विदर्भात चंद्रपूर जिल्हा अव्वलस्थानी आहे. घाऊक दराने निविष्ठांची खरेदी करून ते शेतकऱ्यांना कमी दरात उपलब्धतेसाठी महासंघ प्रयत्नशील आहे.

त्यामुळेच या महासंघाला भारत सरकारच्या योजनांमधून काय मदत करता येईल यासाठी पुढाकार घेतला जाईल. सध्या मदर डेअरीच्या माध्यमातून विदर्भ, मराठवाड्यात साडेचार लाख लिटर दुधाचे संकलन होत आहे. यापुढील काळात हे संकलन तीस लाख लिटरवर नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

Nitin Gadkari
Sharad Pawar On Onion : कांदा प्रश्न राज्य सरकार नीट हातळत नाही; पवारांनी टोचले शिंदे-फडणवीसांचे कान

यातून विदर्भात आर्थिक समृद्धी येईल आणि शेतकरी आत्महत्या कमी होतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. तसेच राजकारणात न अडकता शेतकऱ्यांनी विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असा टोलाही श्री. गडकरी यांनी लगावला. शेतकरी उत्पादक कंपनी महासंघाचे अध्यक्ष नरेंद्र जीवतोडे यांनी प्रास्ताविकातून महासंघाच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला.

अभिनव फार्मर क्‍लबचे ज्ञानेश्‍वर बोडके पाटील, हंसराज अहिर, ग्रामगीता प्रचारक राज घुमनर, रवी मानव, भाऊ थुटे, कांचनी फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे बालाजी ढोबे, यशवंत सायरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्मा प्रकल्प संचालक प्रिती हिरळकर यांची या वेळी उपस्थिती होती.

‘सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल फॉर काऊ’

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून लवकरच केवळ गाईसाठी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील अशाप्रकारचे हे एकमेव हॉस्पिटल असेल. या ठिकाणी गायींवर उपचारासाठी सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधांची उपलब्धता राहील, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com