Livestock Management: शेण-गोमूत्राचा वापर – पशुपालकांसाठी नव्या संधी!

Indigenous Cattle Conservation: देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी शाश्वत पोषण, आधुनिक प्रजनन तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक ऊर्जास्रोत महत्त्वाचे ठरत आहेत. शेतकऱ्यांसाठी उत्पन्न वाढवण्यासाठी जैविक खत, दुग्धजन्य पदार्थ आणि स्वयंपूर्ण बाजारपेठ तयार करणे आवश्यक आहे.
IOT in Agriculture
IOT in AgricultureAgrowon
Published on
Updated on

डॉ. सोमनाथ माने

Modern Breeding Technology:

पोषण व्यवस्थापन

देशी गोवंशाच्या पोषणासाठी शाश्‍वत व्यवस्थापन आवश्यक आहे. कमी संसाधनांमध्ये उच्च पोषक मूल्य असलेला चारा वापरणे महत्त्वाचे आहे.

स्थानिक चारा आणि गवत: सेंद्रिय चारा, कमी खर्चीक गवताचे उत्पादन, डोंगरी गवताचा पुनर्वापर करून पोषण व्यवस्थापन सुधारता येईल.

पशुधनाला आवश्यक असलेल्या सर्व पोषकतत्त्वांची पूर्तता करण्यासाठी जीवनसत्त्वे, खनिजे, आणि प्रथिने असलेला खुराक द्यावा.

चारा उत्पादनात रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने खाद्य उत्पादनांना प्राधान्य द्यावे.

IOT in Agriculture
Indigenous Cow: सेंद्रिय, नैसर्गिक शेतीला देशी गोवंशाची साथ

शाश्‍वत ऊर्जा साधन

शेणापासून बायोगॅस तयार करता येतो, ज्याचा वापर स्वयंपाकासाठी आणि वीज निर्मितीसाठी केला जातो. यामुळे इंधनाची बचत होऊन पर्यावरणपूरक ऊर्जा मिळवता येते.

प्रजनन धोरण

प्रजननाच्या बाबतीत आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच कृत्रिम रेतन, लिंग वर्गीकृत रेतमात्रा आणि भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून, गोवंशाच्या गुणवत्तेचे जतन महत्त्वाचे आहे.

शुद्ध देशी गोवंशाच्या प्रजननासाठी कृत्रिम रेतनाचा वापर करावा. उच्च गुणवत्तेच्या जातिवंत रेतमात्रा वापरून शुद्ध प्रजातींचे संवर्धन करणे शक्य होईल.

उत्कृष्ट जनुकांची ओळख करून त्यांचे संवर्धन करण्यासाठी जनुकाधारित तंत्रज्ञानाचा वापर करावा.

शेतकऱ्यांना स्थानिक गोवंश संवर्धनासाठी विशेष केंद्रांची उपलब्धता महत्त्वाची आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

तापमान आर्द्रता निर्देशांक प्रणालीचा वापर करून गोठ्यातील तापमान आणि आर्द्रता यांचा अभ्यास करून पशुधनासाठी योग्य सल्ला मिळवता येतो. यामुळे उष्णतेमुळे होणाऱ्या तणावाचा परिणाम कमी करता येईल. आयओटी सेंसर्स वापरून गोवंशाचे आरोग्य, आहार आणि प्रजनन स्थितीची नोंद ठेवता येते. सुलभ देखरेख प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुधनाच्या स्थितीबद्दल त्वरित माहिती उपलब्ध करून देईल. आयओटी आधारित प्रणालीचा वापर करून दूध उत्पादनाची नोंद आणि अधिक उत्पादनासाठी उपाययोजना करता येतात.

IOT in Agriculture
Indigenous Cow : स्थानिक पशुधनाचे जतन, संवर्धन करूया

गावठी गाईंमध्ये सुधारणा

महाराष्ट्रातील गावठी (नॉन-डिस्क्रिप्ट) गायींची सुधारणा करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शुद्ध देशी प्रजातींचा संकर, पोषण व्यवस्थापन आणि जनुकाधारित प्रजनन यांसारख्या उपाययोजना प्रभावी आहेत. गावठी गाईंमध्ये सुधारण्यासाठी शुद्ध देशी गोवंशाशी संकर करून उच्च गुणवत्तेची प्रजाती तयार करता येते. यामुळे दूध उत्पादन क्षमता वाढेल, तसेच उष्णता सहन करण्याची क्षमता सुधारेल. साहिवाल, गीर, राठी, लाल सिंधी, थारपारकर आणि देवणी या उच्च गुणवत्ता असलेल्या देशी गोवंश प्रजातींचा वापर गावठी गाईंमध्ये उपयुक्त ठरणारा आहे.

शेण आणि गोमूत्र प्रक्रिया

देशी गोवंशाच्या शेण आणि मूत्राचा शाश्‍वत उपयोग केला जाऊ शकतो, ज्यामुळे अतिरिक्त उत्पन्नाचे साधन निर्माण होईल.

शेणापासून जैविक खत तयार करता येते. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी उत्तम सेंद्रिय खत उपलब्ध होईल.

गोमूत्राचा वापर करून कीटकनाशक निर्मिती शक्य आहे. जे शेतीसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

शेणापासून गोबर गॅस तयार करून ऊर्जा निर्मिती करता येईल, ज्यामुळे घरगुती ऊर्जा गरजांची पूर्तता होईल.

दुग्धजन्य उत्पादने

सध्या देशी गाईंच्या दुधाबरोबर दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ज्या पद्धतीने देशी गाईंची संख्या वाढणार आहे, त्याप्रमाणे वैयक्तिक किंवा सहकारी तत्त्वावर शेतकरी एकत्र येऊन बाजारपेठ तयार होईल. यासाठी देशी गाईचे सेंद्रिय आणि आरोग्यदायी दूध उत्पादन आणि विक्रीसाठी स्वतंत्र बाजारपेठ उभारावी लागणार आहे. दुधापासून तूप, पनीर, दही इत्यादी पदार्थांची निर्मिती करून उत्पन्नाचे नवे साधन तयार करणे शक्य आहे.

डॉ. सोमनाथ माने ९८८१७२१०२२

(प्रमुख शास्त्रज्ञ, देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com