Use of Biochar : जमिनीच्या आरोग्यवर्धनासाठी बायोचारचा वापर आवश्यक

Dr. Shankar Gadakh : ‘‘जमिनीचे आरोग्य सुस्थितीत राखण्यासाठी तसेच भविष्यातील शाश्‍वत शेतीसाठी जमिनीमध्ये तुलनेने सहज शक्य पर्याय म्हणून बायोचारचा विचार होऊ शकतो,’’ असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
Dr. Shankar Gadakh
Dr. Shankar GadakhAgrowon
Published on
Updated on

Akola News : ‘‘जमिनीचे आरोग्य सुस्थितीत राखण्यासाठी तसेच भविष्यातील शाश्‍वत शेतीसाठी जमिनीमध्ये तुलनेने सहज शक्य पर्याय म्हणून बायोचारचा विचार होऊ शकतो,’’ असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.

कृषी विद्यापीठाच्या मृदा शास्त्र विभाग आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग (मुंबई) तर्फे शेत जमिनीचे गुणधर्म सुधारण्यासाठी व पीक उत्पादकता वाढविण्यासाठी ‘बायोचारचा वापर’ या विषयावरील प्रशिक्षण वर्गाचे उद्‍घाटन झाले.

Dr. Shankar Gadakh
Water Shortage Kolhapur : लोकसभेच्या तोंडावर कोल्हापूर जिल्ह्यात पाणी टंचाई, नेते लक्ष घालणार का?

या प्रसंगी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण संचालक डॉ. श्यामसुंदर माने, शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदीरवाडे, पदव्युत्तर शिक्षण संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. ययाती तायडे आणि मृद्‍शास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय भोयर आदी उपस्थित होते. बायोचार हा कोळशाचा प्रकार आहे. जमिनीतील टाकाऊ सेंद्रिय पदार्थांच्या औष्णिक विघटनाने प्राणवायूचा वापर न करता तो बनविला जातो.

Dr. Shankar Gadakh
Cow Milk Subsidy : गोकुळकडून तब्बल अडीच कोटी रुपये गाय दुधाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

डॉ. गडाख म्हणाले, ‘‘विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत शेतकरी एक पीक पद्धतीचा अवलंब करतात. विविध पीक पद्धतीचा अवलंब न केल्यामुळे मुख्य अन्नद्रव्यांमध्ये असंतुलन निर्माण झाले. सद्यःस्थितीत जमिनीचा पोत बिघडून जमिनीचे आरोग्यही ढासळत आहे.

याचा थेट परिणाम जमिनीच्या सुपीकतेवर आणि एकूणच पिकांच्या उत्पादकतेवर होत आहे.चारापिके वगळून शेतातील इतर पिकांचे अवशेष आणि बांधावरील पालापाचोळा वापरून शेतकऱ्यांनी स्वतः बायोचार बनवून आपल्या जमिनीचा कर्ब वाढवावा.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com