Soybean Update : सोयाबीनसाठी संतुलित खतमात्रांचा वापर

Soil Testing : सोयाबीन पिकाला माती परिक्षणानुसार खत वापर करणे गरजेचे आहे. चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जास्त आम्लयुक्त,क्षारयुक्त वा रेताड जमिनीत पीक घेऊ नये.जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चांगले असावे.
Soybean Update
Soybean Update Agrowon

डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ.विजय पाटील,डॉ.अनिल राजगुरू

Soybean Crop Management : सोयाबीन पिकाला माती परिक्षणानुसार खत वापर करणे गरजेचे आहे. चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जास्त आम्लयुक्त,क्षारयुक्त वा रेताड जमिनीत पीक घेऊ नये.जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चांगले असावे.

१) शेवटच्या वखराच्या पाळीपूर्वी शेणखत जमिनीत पसरून द्यावे.पेरणीच्या वेळी ५० किलो नत्र अधिक ७५ किलो स्फुरद अधिक ४५ किलो पालाश अधिक २० किलो गंधक प्रति हेक्टरी द्यावे.स्फुरद देण्यासाठी सिंगल सुपर फॉस्फेट खताचा वापर केला तर अतिरिक्त गंधक देण्याची आवश्यकता नाही परंतु गंधकरहित खतांचा ( १८:१८:१०,१२:३२:१६,१०:२६:२६ डीएपी) वापर केला तर गंधक २० किलो प्रती हेक्टर द्यावे.

२)पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. सर्व रासायनिक खते पेरणीच्या वेळेसच द्यावीत.पेरणी नंतर नत्रयुक्त खतांचा वापर माती परिक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा कमी-जास्त करावी.

पेरणीसाठी ट्रॅक्टरचलित पेरणी व खत यंत्राचा वापर केल्यास खते बियाण्याच्या ५ ते ७ सेंमी खाली पडेल अशा रीतीने पेरणी करावी.बियाण्यास खतांचा स्पर्श होऊ देऊ नये.

Soybean Update
Brazil Soybean Export : ब्राझीलची सोयाबीन निर्यात ९७० लाख टनांवर पोचणार

खतमात्रा ( किलो प्रती हेक्टरी)

अ.न.--- खत मात्रेचे पर्याय (किलो /हेक्टर)

१.---डीएपी १६३ किलो + युरिया ४६ किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ७५ किलो.

२.--- युरिया१०९ किलो + एसएसपी-४६९ किलो + म्युरेट ऑफ पोटॅश ७५ किलो

३.---१५:१५:१५ ३०० किलो + एसएसपी १८८ किलो + युरिया ११ किलो

४---१०:२६:२६ १७३ किलो + डीएपी-६५ किलो + युरिया ४६ किलो

५ ---१०:२६:२६ -१७३ किलो + एसएसपी- १८८ किलो + युरिया ७१ किलो

६.१८:१८:१० २७८ किलो.+ एसएसपी १५६ किलो + म्युरेट ऑफ पोटॅश २८ किलो.

७. १२:३२:१६ २३४ किलो.+ एसएसपी१८८ किलो + युरिया ४८ किलो

जॉइंट ॲग्रेस्को शिफारस

महाराष्ट्रातील उप पर्वतीय विभागाच्या हलक्या जमिनीमध्ये सोयाबीनच्या अधिक उत्पादन आणि आर्थिक फायद्यासाठी शिफारशीत खत मात्रेमधील ( ५०किलो.नत्र, ७५ किलो स्फुरद ,४५ किलो पालाश आणि १० टन शेणखत प्रती हेक्टर) ५० टक्के नत्र व पालाश पेरणीच्या वेळी आणि उर्वरित पेरणीनंतर ३५ दिवसांनी देण्याची शिफारस करण्यात येत आहे.

उत्पादन वाढीसाठी महत्त्वाच्या टिप्स:

१) पिकाची फेरपालट करावी.

२) पेरणी वेळेवर करावी ( १५ जुलै पूर्वी). पेरणी ही उतारास आडवी पूर्व पश्चिम करावी.

३) पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.

४) १०० टक्के शुद्ध दर्जेदार बियाणे पेरणीसाठी वापरावे.पेरणीपूर्वी बियाणांची उगवणशक्ती तपासून मगच पेरणी केल्यास झाडांची संख्या उत्तम राखता येईल.

५) जमिनीच्या पोतानुसार पेरणीचे अंतर ठेवावे.( ४५ x ५ सेंमी. किंवा ३० x १५ सेंमी) बियाणे ३.५ ते ४ से.मी पेक्षा खोल पेरू नये.

६) हेक्टरी रासायनिक खताबरोबर १० किलो बोरॅक्स आणि २० किलो झिंक सल्फेट द्यावे.

७) पीक २० ते २५ दिवसांचे असताना सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिवळे पडल्यास सूक्ष्म अन्नद्रव्य ५० मिलि प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

८) पेरणीनंतर नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा

९) पीक फुलोरावस्थेत असताना डवरणी करू नये.

१०) शेंगा लागण्याच्या अवस्थेत १९:१९:१९ तर शेंगा भरण्याच्या अवस्थेत ०:५२:३४

या विद्राव्य खतांची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.

११) पावसाचा खंड पीक फुलोरावस्थेत व दाणे भरण्याच्या वेळेस पडल्यास पाण्याचे व्यवस्थापन करावे,म्हणजे उत्पादनात घट येणार नाही.

जाती आणि कालावधी

१) कमी कालावधीच्या जाती (८०-९० दिवस) ः जेएस -२०-३४, जेएस-९५-६०, जे एस -९३०५, एमएयुएस-४७

२) मध्यम कालावधीच्या जाती (९५-१०५ दिवस ) ः फुले दूर्वा (केडीएस ९९२), फुले किमया(केडीएस ७५३), पीडीकेव्ही अंबा(एएमएस१००-३९), पीडीकेव्ही सुवर्ण सोया( एएमएसएमबी ५-१८)

३) पाने आणि शेंगांवर लव असणाऱ्या जाती ः एएमएस१००१ (पीडीकेव्ही यलो गोल्ड), एमएयुएस १६२, एमएयुएस ६१२,एमएयुएस १५८, जेएस२०-२९, जेएस २०-११६

४) जास्त कालावधीच्या जाती ( ११५ ते १२० दिवस) ः फुले संगम(केडीएस ७२६),

Soybean Update
Soybean Farming Training : पुसाणे येथे सोयाबीन पिकावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण

कृषी विद्यापीठांच्या सुधारित जाती

१) महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी : फुले दूर्वा (केडीएस ९९२),फुले किमया(केडीएस ७५३),फुले संगम(केडीएस ७२६),फुले अग्रणी(केडीएस ३३४),फुले कल्याणी (डीएस २२८)

२) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ,परभणी - एमएयुएस ७१( समृद्धी ), एमएयुएस १५८, एमएयुएस १६२, एमएयुएस ६१२

३) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोली - एएमएस१००१ (पीडीकेव्ही यलो गोल्ड) पीडीकेव्ही अंबा(एएमएस१००-३९)

४) आघारकर संशोधन संस्था, पुणे - एमएयुएस११८८, एमएयुएस१२८१

५) जेएनकेकेव्ही,जबलपूर - जेएस ३३५ ,जेएस ९३-०५, जेएस ९७-५२ ,जेएस२०-२९ जेएस २०-११६

संपर्क - डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९, (मृद शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com