Global Oil Market: अमेरिकेने इराणवर पुन्हा एकदा सागरी नाकाबंदी लादली असून, बुधवारी (ता.१५) पहाटेपासून हवाई हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. या हल्ल्यांमध्ये इराणच्या लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले असून, सात सैनिकांचा मृत्यू झाला आहे, तर देशभरात २६० जण जखमी झाल्याची माहिती इराणी अधिकाऱ्यांनी दिली. .अमेरिकेच्या या आक्रमक कृतीनंतर इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड’ने पश्चिम आशियातील तेल आणि वायूची निर्यात पूर्णपणे थांबविण्याचा इशारा दिला आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील या संघर्षामुळे आखातामध्ये युद्धाचे ढग गडद झाले आहेत..US Israel Iran War: अमेरिका- इराण यांच्यात १४ कलमी करार, होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार.इराण सरकारच्या प्रवक्त्या फातेमेह मोहाजेरानी यांनी सांगितले, ‘‘गेल्या काही दिवसांत ३० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सात जणांचा मृत्यू सिस्तान-बलुचिस्तान प्रांतातील बामपूर येथील लष्करी तळावरील अमेरिकन हल्ल्यात झाला. अमेरिकेने यापूर्वी एप्रिलमध्ये नौदल नाकाबंदी लागू केली होती. जूनमध्ये इराणच्या अणुकार्यक्रमासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी झालेल्या करारानंतर ती उठविण्यात आली होती. मात्र सामुद्रधुनीवरील तणाव वाढल्याने चर्चा ठप्प झाली असून अमेरिकेने पुन्हा नाकाबंदी लागू केली आहे.’’.US Iran Conflict: अमेरिकेचे इराणवर तीव्र हल्ले; इराणकडूनही आखाती देश लक्ष्य.दरम्यान, नौदलाची नाकाबंदी लागू होताच सात तासांच्या कारवाईत अनेक लक्ष्यांवर हवाई हल्ले करण्यात आले. इराणच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रवक्ते हुसेन केरमनपूर यांनी देशभरात २६० हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगितले. ‘इराणकडून होणारी तेल आणि वायूची निर्यात सर्वांसाठी असेल किंवा कोणासाठीच नसेल,’ असे रिव्होल्युशनरी गार्डने म्हटले आहे. .बुधवारी पहाटे बहारीन आणि कुवेतमध्ये इराणकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांमुळे घबराट निर्माण झाली होती. जॉर्डननेही इराणची तीन क्षेपणास्त्रे हवेतच पाडल्याचा दावा केला आहे. इराणने या तिन्ही देशांवर हल्ले केल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’चे प्रमुख ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी इराणने आखाती देशांवर अनेक क्षेपणास्त्रे, ड्रोन हल्ले केल्याचा आरोप केला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.