Kolhapuri Barrage : शिवगंगा नदीवरील बंधारा जर्जर अवस्थेत

River Barrage : शिवगंगा नदी तसेच कात्रज घाटामधून येणाऱ्या खेड ओढ्यांवर पावसाळ्यानंतरही शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरवस्था झाली आहे.
River Barrage
River Barrage Agrowon
Published on
Updated on

Pune News : : शिवगंगा नदी तसेच कात्रज घाटामधून येणाऱ्या खेड ओढ्यांवर पावसाळ्यानंतरही शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरवस्था झाली आहे.

बंधाऱ्यांमुळे शिवगंगा खोरे तसेच खेड ओढ्यालगतची हजारो हेक्टर जमीन ओलिता खाली आले. मात्र बंधाऱ्यांची देखभाल दुरुतीच्या योग्य नियोजनाअभावी शेतकऱ्यांना दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

बंधाऱ्यात पाणी राहिले नसल्याने भोर व हवेली तालुक्यातील खरिपाच्या पिकाची पाणी देण्यास अडथळा निर्माण झाला आहे. मागणी करूनही या बंधाऱ्यांची दुरुस्ती नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवगंगा खोऱ्यामध्ये सिंहगड पायथ्यापासून उगम होणाऱ्या शिवगंगा नदीवर तसेच कात्रज बोगदा परिसरातील शेतकऱ्यांना उन्हाळ्यात पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

River Barrage
River Barrage : भीमा, सीना नदीवरील बॅरेजेससाठी सर्वेक्षणाच्या सूचना

हद्दीच्या वादामुळे दुर्लक्ष

शिवगंगा नदीवर नसरापूरपासून शिवापूरपर्यंत अनेक बंधाऱ्यांवर प्लेटा न टाकल्याने त्या पडून आहेत. काही ठिकाणी बंधारा एका ग्रामपंचायतीच्या हद्दीत तर त्याचे लाभक्षेत्र दुसऱ्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत आहे. त्यामुळे एका गावच्या शेतकऱ्यांना दुसऱ्या गावच्या ग्रामपंचायतीवर अवलंबून रहावे लागत आहे.

संबंधित ग्रामपंचात देखील याबाबत उदासिन आहेत. काही ठिकाणी दोन तालुक्यांची हद्द असल्यामुळे बंधाऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीला बंधारे अडवण्यासाठी व खुले करण्यासाठी निधी दिला जातो. याचा वापर होत आहे कि नाही याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

River Barrage
Rajapur Barrage : राजापूर बंधाऱ्याची पाणीपातळी योग्य राखण्याची मागणी

...अशी आहे सद्य:स्थिती

कोल्हापूर पद्धतीचे बहुतांश बंधारे नादुरुस्त

पुरात वाहून आलेल्या प्लॅस्टिक कचरा, राडारोड्यामुळे दुरवस्था

ओढ्यालगत वाढलेली झाडे झुडपे,

काही पुरात वाहून गेल्या तर काही चोरीला

काही प्लेटा खराब होऊन गंजल्या आहेत.

बंधारे बांधल्यानंतर जलसंधारण विभागाकडून ग्रामपंचायतीकडे हस्तांतर केले जातात. त्यापुढे ग्रामपंचायतीने बंधारे अडवणे, खोलणे करायचे असते त्यासाठी ५० टक्के निधी जलसंधारणाकडून दिला जातो. शिवगंगा खोऱ्यातील अनेक बंधाऱ्यांच्या प्लेटा चोरीस गेल्या आहेत. यासाठी ग्रामपंचायतीने चोरीस गेलेल्या प्लेटांबाबत पोलिस ठाण्यात तक्रार व खराब झालेल्या प्लेटाबाबत निर्लेखण प्रस्ताव करून त्याचा लिलाव करून ते पैसे जिल्हा परिषदेकडे वर्ग केल्यावर नवीन प्लेटा खरेदी केल्या जातात. जिल्हा नियोजन समितीकडे १७ कामांचा प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे.
- अतुल राजापूरकर, अभियंता, भोर पंचायत समिती जलसंधारण विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com