Urea Shortage: यवतमाळमध्ये युरियाच्या टंचाईमुळे शेतकरी हवालदिल

Farmer Problems: खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच यंदा युरियाचा तुटवडा आहे. जूनमध्ये मागणीच्या तुलनेत कंपनीकडून झालेला पुरवठा कमी आहे. शेतकऱ्यांकडून मागणी होत असतानाही युरियाचा तुटवडा आहे.
Urea Shortage
Urea ShortageAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News: खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच यंदा युरियाचा तुटवडा आहे. जूनमध्ये मागणीच्या तुलनेत कंपनीकडून झालेला पुरवठा कमी आहे. शेतकऱ्यांकडून मागणी होत असतानाही युरियाचा तुटवडा आहे. प्रशासनासमोर तुटवडा दूर करून युरिया उपलब्ध करून देण्याचे आव्हान आहे.

जिल्ह्यात यंदा नऊ लाखांहून अधिक हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. पेरणीसाठी बियाणे, खते, कीटकनाशकांचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. असे असले तरी हंगामाच्या सुरुवातीलाच सोयाबीन बियाणे, युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांकडून मागणी असलेले सोयाबीन बियाणे बाजारात उपलब्ध नाही.

Urea Shortage
Urea Shortage: खानदेशात युरियाची टंचाई! शेतकरी हवालदिल

सोयाबीनचा तुटवडा निर्माण झाल्याने ठराविक ‘ब्रॅण्ड’च्या किमतीत वाढ झाली आहे. पावसाला विलंब झाला आहे. त्यातही बियाणे नसल्याने आणखी उशीर करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी मिळेल त्या कंपनीच्या बियाण्यांची लागवड करण्यास सुरुवात केली आहे. अशा अडचणीच्या परिस्थितीला तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना आता युरियाच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.

Urea Shortage
Urea Shortage : रब्बी हंगामापूर्वीच युरियाची टंचाई

सध्या जिल्ह्यात युरियाचा तुटवडा निर्माण झाला आहे. २०२५ च्या हंगामासाठी ६६ हजार १५३ टनांचा पुरवठा मंजूर आहे. जूनअखेर २९ हजार १०७ टनांचे नियोजन मंजूर आहे. यातील केवळ १४ हजार ९६० टनांचा पुरवठाच झाला आहे.

गेल्यावर्षीचा शिल्लक तसेच यंदाचा आलेला साठा मिळून ३७ हजार ५६६ टन युरिया उपलब्ध असल्याची नोंद आहे. या नंतरही शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याची ओरड होत आहे. युरियाचा तुटवडा असल्याने कृषी विभाग, आरसीएफ कशा पद्धतीने नियोजन करणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अडीच लाख हेक्टरवरच पेरणी

पावसाने पाठ फिरविल्याने पेरणीची गती सुरुवातीला कमी होती. सुरुवातीच्या टप्प्यात यवतमाळ जिल्ह्यात केवळ २९ टक्के क्षेत्रावर लागवड झाली. नऊ लाख हेक्टरपैकी दोन लाख ६४ हजार २६० हेक्टरवर पेरणी झाली होती. यात सर्वाधिक एक लाख ८३ हजार ८७० हेक्टरवर कापूस, ५० हजार ८३० हेक्टरवर सोयाबीन तर २९ हजार हेक्टरवर तुरीची लागवड झाली. दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने पेरणीची गती वाढली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com