Urea Sale : देशातील युरियाचा वापर घटला; उत्पादन, आयातही वाढली

Kharif Sowing Update : देशात खरिपाच्या पेरण्या मे महिन्यापासून जोर धरतात. सिंचनाच्या व्यवस्था असलेल्या भागांमध्ये देशात माॅन्सून दाखल होण्याच्या आधीच पेरण्या होतात.
Urea Sale
Urea SaleAgrowon
Published on
Updated on

Urea Selling Rate : देशात यंदा युरिया उत्पादनात १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर देशात युरियाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी आयातही ३७ टक्क्यांनी वाढली. पण एप्रिल आणि मे महिन्यातील युरियाची विक्री कमी झाली आहे.

या दोन्ही महिन्यांमध्ये ३१ लाख टन युरिया विकला गेला. गेल्या हंगामात या काळातील युरियाची विक्री ३२ लाख ३० हजार टन होती, असे उद्योगांच्या वतीने सांगण्यात आले.

देशात खरिपाच्या पेरण्या मे महिन्यापासून जोर धरतात. सिंचनाच्या व्यवस्था असलेल्या भागांमध्ये देशात माॅन्सून दाखल होण्याच्या आधीच पेरण्या होतात. यंदा मार्च आणि एप्रिल महिन्यात पाऊस चांगला झाला होता. यामुळे काही भागातील पेरण्या मे महिन्यातच आटोपल्या.

माॅन्सून आता काही भाग सोडल्यास संपूर्ण देश व्यापला. अनेक भागांमध्ये पाऊसही होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना गती दिली. परिणामी जुलै महिन्यात खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे.

Urea Sale
Urea Use : युरियाचा वापर कसा कमी करावा?

देशात एरवी एप्रिल आणि मे महिन्यात युरियाची जवळपास ४९ लाख टनांची मागणी असते. त्यापैकी खत कंपन्यांकडून ६४ टक्क्यांची विक्री झाली. खत कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील हंगामात माॅन्सून उशीर आला नव्हता. तसेच एल निनोची स्थितीही नव्हती.

त्यामुळे शेतकऱ्यांनी जून महिन्यात खरिपाच्या पेरण्या करण्यासाठी युरियाची मोठ्या प्रमाणात खेरदी केली होती. परंतु यंदा स्थिती काहीशी अनिश्चित आहे. पण तरीही माॅन्सून सरासरीपेक्षा कमी कालवधीत देश व्यापेल, अशी आशा आहे.

यंदाच्या हंगामात जून ते ऑगस्ट या काळात युरियाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. यंदा शेतकऱ्यांनी पेरणीच्या आधी खतांची खरेदी केलीली दिसत नाही. मे २०२२ मध्ये युरियाची विक्री वाढली होती. केवळ युरियाच नाही तर शेतकऱ्यांनी टंचाई असतानाही इतर खतांच्या खरेदीसाठी दुकानांवर गर्दी केली होती.

उपलब्ध माहितीनुसार, एप्रिल महिन्यात जवपास १२ लाख टन युरियाची विक्री झाली होती. तर मे महिन्यात १९ लाख ४० हजार टनांची विक्री झाली. या दोन्ही महिन्यांमध्ये युरियावरील अनुदान १६ हजार १३३ कोटी रुपये होते. त्यापैकी एप्रिल महिन्यातील अनुदान ६ हाजर ८६७ कोटी आणि मे महिन्यातील अनुदान ९ हजार २६५ कोटी रुपये होते.

चालू खरिप हंगामात म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर या काळात सरकारने १७० लाख टन युरियाची मागणी राहील. तर नॅनो युरियाची गरज यंदा १ कोटी ७८ लाख बाॅटल्सची असेल, असा अंदाज व्यक्त केला. जून महिन्यात जवळपास ३१ लाख टन युरियाची गरज लागेल, असेही सरकारने म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com