
Chhatrapati Sambhajinagar: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत यंदा उडीद व मुगाची अपेक्षित पेरणी झाली नाही. दुसरीकडे मुगाच्या तुलनेत उडदाच्याच पेरा जास्त झाल्याची स्थिती आहे.
यंदा मराठवाड्यात उडदाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ४४ हजार ४३१ हेक्टर इतके आहे. या सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ८७.६८ टक्के म्हणजे १ लाख २६ हजार ६३८ हेक्टरवर उडदाची पेरणी झाली आहे.
पेरणी झालेल्या या उडदाच्या क्षेत्रात छत्रपती संभाजीनगर विभागातील तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण ४८,८३८ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत सुमारे १२३.४६ टक्के म्हणजे ६०२९४ हेक्टरवर तसेच लातूर विभागातील पाच जिल्ह्यातील सर्वसाधारण ९५,५९२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ६९.४५ टक्के म्हणजे ६६,३४४ हेक्टरवर पेरणी झालेल्या उडदाच्या क्षेत्राचा समावेश आहे.
मुगाच्या पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये लातूर विभागातील पाच जिल्ह्यात सर्वसाधारण ७२ हजार ३८६ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत पेरणी झालेल्या ४४,६४१ हेक्टर म्हणजे सुमारे ६१.६७ टक्के तर छत्रपती संभाजीनगर विभागातील तीन जिल्ह्यातील सर्वसाधारण ४९ हजार ७६७ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत पेरणी झालेल्या ३८ हजार ५११ हेक्टर म्हणजे सुमारे ७७.३८ टक्के क्षेत्राचा समावेश आहे.
मराठवाड्यात ४७ लाख ८० हजार १५५ हेक्टरवर पेरणी
मराठवाड्यात यंदा खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र ४९ लाख ७२ हजार ७२८ हेक्टर इतके आहे. त्या तुलनेत प्रत्यक्षात ४७ लाख ८० हजार १५५ हेक्टर म्हणजे सुमारे ९६.१३ टक्के पेरणी आटोपली आहे. झालेल्या पेरणीमध्ये सर्वाधिक २४ लाख ७६ हजार ९० हेक्टरवरील सोयाबीन, १२ लाख ९१ हजार २३५ हेक्टरवरील कपाशी, ३ लाख ४० हजार ५८९ हेक्टरवरील मका, ४१२५१ हेक्टरवरील बाजरी
१३८०१ हेक्टरवरील खरीप ज्वारी, १०५३ हेक्टरवरील भात, १८१३ हेक्टरवरील इतर तृणधान्य, ३ लाख ९० हजार ३९५ हेक्टरवरील तूर, ८३,१५२ हेक्टरवरील मूग, १ लाख २६ हजार ६३८ हेक्टरवरील उडीद,१२७८ हेक्टरवरील इतर कडधान्य,१०४९६ हेक्टरवरील भुईमूग, २९१ हेक्टरवरील कारळ,१५ हेक्टरवरील सूर्यफूल, ८३८ हेक्टरवरील इतर गळीतधान्य आदी पिकांचा समावेश आहे.
तीन जिल्ह्यांत मूग, उडदाची अपेक्षेपेक्षा जास्त पेरणी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुगाची तर बीड व धाराशिव जिल्ह्यात उडदाची अपेक्षेच्या पुढे जाऊन पेरणी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुगाचे सर्वसाधारण क्षेत्र ११ हजार ७ हेक्टर असताना प्रत्यक्षात ११,४८३ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या सुमारे १०४.३२ टक्के क्षेत्रावर मुगाची पेरणी झाली.
दुसरीकडे बीड जिल्ह्यात उडदाचे सर्वसाधारण क्षेत्र ३४ हजार ६९६ हेक्टर असताना प्रत्यक्षात ५० हजार ३२४ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सुमारे १४५.०४ टक्के क्षेत्रावर उडदाची पेरणी झाली आहे. धाराशिव जिल्ह्यात उडदाचे सर्वसाधारण क्षेत्र ४०३६५ हेक्टर असताना प्रत्यक्षात सुमारे ४१ हजार २२३ हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १०२.१२ टक्के क्षेत्रावर उडदाची पेरणी झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.