Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Preliminary Report : परभणी जिल्ह्यातील परभणी व मानवत तालुक्यांतील ४२ गावांचा पाणीपुरवठा व सिंचनासाठी गोदावरी व दुधना या नद्यांवर ४ बंधारे बांधून उपसा सिंचन योजना प्रस्तावित करण्यात आल्याचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे.
Upsa Irrigation
Upsa Irrigation Agrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील परभणी व मानवत तालुक्यांतील ४२ गावांचा पाणीपुरवठा व सिंचनासाठी गोदावरी व दुधना या नद्यांवर ४ बंधारे बांधून उपसा सिंचन योजना प्रस्तावित करण्यात आल्याचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला आहे.

या योजना कार्यान्वित झाल्यानंतर सुमारे १८ हजार हेक्टर सिंचनाखाली येईल तसेच गावांच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न मार्गी लागेल, अशी माहिती ४२ गाव पाणी संघर्ष समितीतर्फे शनिवारी (ता. १४) पत्रकार परिषदेत देण्यात आली.

Upsa Irrigation
Takari Upsa Irrigation Scheme : सांगलीतील दुष्काळी तालुक्यातील ताकारी उपसा सिंचन योजना लवकरच होणार सुरू

४२ गाव पाणी संघर्ष समितीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे परभणी व मानवत तालुक्यांतील ४२ गावांना पिण्याचे व सिंचनाच्या सुविधेसाठी पाणी उपलब्धतेबाबत प्राथमिक सर्वेक्षण करून तत्काळ अहवाल सादर करावा, असे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे सहायक मुख्य प्रशासक एच. जे. शिंदे यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता यांच्या नावे ऑगस्टमध्ये काढले.

Upsa Irrigation
Upsa Irrigation Scheme : मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला अखेर मंजुरी

त्यानुसार या गावांच्या सिंचनाच्या सुविधेसाठी गोदावरी नदीवर रामपुरी बुद्रुक (ता. मानवत) येथून तसेच दुधना नदीवर सावंगी ते ईरळद (ता. मानवत) दरम्यान बंधारा बांधून, कोथाळा ते वडगाव (ता. मानवत) दरम्यान बंधारा बांधून तसेच कुंभारी ते डिग्रस (ता. परभणी) दरम्यान बंधारा बांधून उपसा सिंचन योजना प्रस्तावित करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० चे कार्यकारी अभियंता पी. बी. लांब यांनी सादर करण्यात आला.

यापैकी काही गावांचे अंशतः क्षेत्र निम्न दुधना प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येते. या भागातील ४० टक्के क्षेत्र सिंचनाखाली आणायचे झाल्यास अंदाजे १८ हजार हेक्टर सिंचन होईल. त्यासाठी ६० दलघमी पाण्याची आवश्यकता लागेल. या योजना कार्यान्वित होईपर्यंत जनआंदोलन सुरूच राहणार आहे. पिंपळा (ता. मानवत) येथे पाणी परिषदेत आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली. पत्रकार परिषदेस ४२ गाव पाणी संघर्ष समितीचे रंगनाथ सोळंके, संतोष देशमुख, शिवाजी बोचरे, माणिक काळे, गणेश देशमुख आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com