Panchayat Samiti : डहाणू पंचायत समितीच्या आमसभेत गदारोळ

Water Supply Scheme : डहाणू पंचायत समितीची २०२२-२३ वर्षाची आमसभा तब्बल सहा वर्षांनी झाली. मात्र, ही आमसभा मोठ्या गदारोळात पार पडली.
dahanu Panchayat Samiti
dahanu Panchayat SamitiAgrowon
Published on
Updated on

Dahanu News : डहाणू पंचायत समितीची २०२२-२३ वर्षाची आमसभा तब्बल सहा वर्षांनी झाली. मात्र, ही आमसभा मोठ्या गदारोळात पार पडली. या सभेला अनेक खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिले नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आमदार कॉ. विनोद निकोले यांनी सांगितले. तसेच बाडापोखरण पाणीपुरवठा योजनेचे काम अर्धवट ठेवल्याने ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश देण्यात आले.

डहाणू येथील दशाश्री माळी सभागृहात डहाणू पंचायत समितीची २०२२-२३ या वर्षाची आमसभा तब्बल सहा वर्षांनंतर बुधवारी (ता. २१) आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

dahanu Panchayat Samiti
Panchayat Samiti : दहा पंचायत समित्यांची सभापतिपदे महिला राखीव

या वेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुरू असलेली बाडापोखरण प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना, अस्वली धरण पाणीपुरवठा योजना, कैनाड मोडगाव, दाभोण, रायपूर येथील २०० कोटींच्या विविध पाणीपुरवठा योजना अर्धवट असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते.

त्यात अनेक प्रकारचे गैरव्यवहार झाल्याचे आरोपही नागरिकांनी केले. बाडापोखरण प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे ठेकेदार कामे अर्धवट सोडून कोट्यवधींची बिले घेऊन निघून गेल्याचा आरोप करण्यात आला. त्यांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश आमदार कॉ. विनोद निकोले यांनी दिले.

dahanu Panchayat Samiti
Panchayat Samiti : सावनेर पंचायत समितीला ‘आयएसओ’ मानांकन

या वेळी जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा, पंचायत समिती सभापती प्रवीण गवळी, उपसभापती पिंटू गहला, तहसीलदार अभिजीत देशमुख, गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते, पूजा भोईर, सरपंच, नागरिक व सरकारी कर्मचारी उपस्थित होते.

गर्भवतींची परवड

डहाणू उपजिल्हा रुग्णालय दोनशे खाटांचे करण्यात येऊन त्या ठिकाणी सर्व डॉक्टरांची पदे भरण्यात यावीत, अशी मागणी करण्यात आली. या रुग्णालयात १३ डॉक्टरांची पदे मंजूर असताना केवळ तीन डॉक्टर नियुक्त करण्यात आले आहेत. दरमहा ३०० महिलांची प्रसूती होत असून तज्ज्ञ डॉक्टरांअभावी तीन वर्षांत तब्बल ८५६ गर्भवतींना प्रसूतीसाठी गुजरात राज्यात पाठवण्यात आल्याचे डॉ. हिंगणे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com