Panchayat Samiti : सावनेर पंचायत समितीला ‘आयएसओ’ मानांकन

ISO Rating For Panchayat Samiti : कामाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन यांसह दस्तऐवजांचे वर्गीकरण अशा सर्व बाबींच्या माध्यमातून सावनेर पंचायत समितीने आय.एस.ओ. मानांकन मिळविले आहे.
Panchayat Samiti
Panchayat SamitiAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : कामाचे नियोजन, वेळेचे व्यवस्थापन यांसह दस्तऐवजांचे वर्गीकरण अशा सर्व बाबींच्या माध्यमातून सावनेर पंचायत समितीने आय.एस.ओ. मानांकन मिळविले आहे. अशा प्रकारचा बहुमान मिळविणारी जिल्ह्यातील तिसरी, तर चालू आर्थिक वर्षातील ही पहिली पंचायत समिती ठरली आहे.

निर्धातील कालावधीत काम पार पाडणे, संघटितपणे कामाला प्राधान्य देणे, सहकाऱ्यांमध्ये खेळाडू वृत्ती, वेळेचे नियोजन, दस्तऐवजांचे संगणकीकरण यांसह विविध बाबी विचारात घेत आय.एस. ओ. प्रमाणपत्र दिले जाते. सावनेर पंचायत समितीने या प्रमाणपत्रासाठी आवश्‍यक बाबींची पूर्तता केली होती.

Panchayat Samiti
Bribe News : लाच प्रकरणी पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी जाळ्यात

या कामांची पाहणी आय.एस.ओ. मानांकन पथकाकडून करण्यात आली. पथकाचे समाधान झाल्याने आय.एस.ओ. मानांकन देत पंचायत समिती प्रशासनाचा गौरव करण्यात आला. ग्लोबल सर्टिफिकेशन संस्थेचे अंकेक्षण अधिकारी विनोद कोल्हे यांच्या हस्ते पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज हिरुडकर यांनी हे प्रमाणपत्र स्वीकारले.

यावेळी पंचायत समिती उपसभापती राहुल तिवारी, माजी सदस्य गोविंद ठाकरे, पंचायत समिती सदस्य प्रफुल्ल करणायके, जिजाबाई बागडे, पुष्पा करमाडे, रामदास गुंजरकर, महेश राऊत, कल्पना राखडे, कृषी अधिकारी प्रीती गाडे, चंद्रशेखर वानखडे, संकेत जससिंगकार उपस्थित होते.

Panchayat Samiti
Free Ration Scheme: देशातील ८१.३५ कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्य

तहसीलदार मलिक विराणी, नायब तहसीलदार संदीप डाबेराव, जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्‍ता कोकड्डे यांनी पंचायत समिती पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांचे या कामाबद्दल अभिनंदन केले आहे.

पंचायत समितीच्या कामकाजाचे मूल्यांकन करून हे मानांकन मिळाले आहे. यापुढे देखील कामाची गुणवत्ता राखत आमची वाटचाल सुरू राहील.
- मनोज हिरुडकर, गटविकास अधिकारी, पंचायत समिती सावनेर.
कामकाजाच्या योग्य अंमलबजावणीमुळे आय.एस.ओ. मानांकन मिळविण्यात सावनेर पंचायत समिती यशस्वी ठरली. ही निश्चितच सर्वांसाठी गौरवाचा क्षण आहे.
गोविंद ठाकरे, पंचायत समिती सदस्य, सावनेर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com