Agricultural Fund : ‘कृषी’च्या निधी पूर्ततेसाठी महाडीबीटी वर कागदपत्रे अपलोड करा

सन २०२१-२२ मध्ये मंजूर कामाची दोन वर्षाची मुदत ३१ मार्च २०२३ रोजी संपत आहे.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

Parbhani News : राज्य शासनाच्या कृषी विभागांशी (Agricultural Department) संबंधित विविध योजनांचा लाभ घेतलेल्या मात्र आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची राहून गेली आहेत. अशा गरजू व पात्र लाभार्थ्यांनी उर्वरित निधी मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर (MahaDBT Portal) सर्व कागदपत्रे तत्काळ अपलोड करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी केले आहे.

सन २०२१-२२ मध्ये मंजूर कामाची दोन वर्षाची मुदत ३१ मार्च २०२३ रोजी संपत आहे. मंजूर कामे १५ मार्चपूर्वी बांधकामासह पूर्ण करावीत. या योजनेच्या संदर्भात लाभार्थ्यांची अडचण असल्यास कृषी अधिकारी, पंचायत समिती, कृषी विभाग, जिल्हा परिषद यांच्याशी संपर्क साधावा.

Indian Agriculture
Farm Pond Scheme : ‘वैयक्तिक शेततळ्यासाठी महाडीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करा’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती, विद्युत आकार भरणा, पंपसंच आदींसाठी राज्य शासनाच्या ‘महाडीबीटी पोर्टल’द्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड करण्यात आली आहे.

यामध्ये अनेक लाभार्थ्यांनी अद्यापही संपूर्ण कागदपत्रे अपलोड केली नाहीत. कागदपत्रे लवकर अपलोड केल्यास मंजूर कामाचे कार्यारंभ आदेश लवकर देता येतील व त्यांना ३१ मार्च २०२३ पूर्वी आर्थिक लाभ मिळतील.

कार्यारंभ आदेश लवकर मिळाल्यास नवीन विहिरीची कामे याच उन्हाळ्यात बांधकामासह पूर्ण करता येतील.

Indian Agriculture
Honey Portal : मधाच्या नोंदीसाठी ‘मधुक्रांती पोर्टल’

कागदपत्रे उशिरा अपलोड केल्यास कार्यारंभ आदेश उशिरा मिळतील व विहिरीची कामे कामे उशिरा सुरु होतील.

पावसाळ्यापूर्वी विहिरींची कामे बांधकामासह पूर्ण होऊ न शकल्याने पावसाळ्यात विहिरी ढासळतील. तसेच त्या गाळाने भरल्यास शेतकऱ्याचे नुकसान होईल व अनावश्यक खर्च वाढेल

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com