
Buldana News: गेले दोन दिवसा वादळीवारा व पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक मका उत्पादकांना फटका बसला असून हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. ही आपत्ती मक्याची लागवड असलेल्या तालुक्यांवर सर्वाधिक कोसळली होती.
जिल्ह्यात बुधवार (ता.२) व गुरुवारी (ता.३) ठिकठिकाणी अवकाळी पाऊस, वादळ घोंगावले होते. याची तीव्रता मोताळा, नांदुरा, खामगाव, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर, बुलडाणा या तालुक्यांत अधिक होती. हेच तालुके या वर्षी मका लागवडीत अग्रेसर राहिलेले आहेत. मक्याचे पीक आता काही ठिकाणी कणसाच्या अवस्थेत तर काही ठिकाणी परिपक्व झाल्याने काढणीला आले होते. अशा काळात वादळाने धुमाकूळ घातल्याने शेतशिवारात मका जमीनदोस्त झाल्याचे पुढे आले आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात तब्बल ३१ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर मक्याची लागवड झालेली आहे. जिल्ह्यात एकरी उत्पादकता ४० ते ५० क्विंटलपर्यंत असल्याने मोठ्या उत्पादनाची यंदा अपेक्षा होती. एकूण क्षेत्रात सर्वाधिक लागवड मोताळा तालुक्यात ७२३१ हेक्टरवर झालेली होती. शिवाय जळगाव जामोद तालुक्यात १९४५ , संग्रामपूर १२३०, चिखली १९४६, बुलडाणा ३८६८, देऊळगावराजा १८५०, मेहकर ५२७, सिंदखेडराजा ५२४, लोणार १४१०, खामगाव ३६७०, शेगाव ३५, मलकापूर ४४४५ आणि नांदुरा तालुक्यात ३७२५ हेक्टरवर पेरणी झालेली आहे.
वादळाचा तडाखा बसलेल्या यापैकीच्या तालुक्यात मक्याचे उभे पीक जमिनीवर लोळले आहे. यामुळे आता उत्पादकतेवर मोठा परिणाम होऊ शकतो, असे शेतकरी सांगता आहेत.
जिल्हा प्रशासनाने या आपत्तीत ४२०० हेक्टरपर्यंत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज दिला आहे. मात्र यात मोठी वाढ होऊ शकते. त्यातही मका पिकाचे नुकसान सर्वाधिक आहे.
यंदा मक्याची अडीच एकरांत लागवड केलेली असून पीक चांगले जुळून आले होते. व्यवस्थापनावर मोठा खर्च झाला आहे. मात्र, गुरुवारच्या वादळ व पावसात संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले. पिकाचे ९५ टक्के नुकसान झाले. माझ्यासारखीच स्थिती आजू
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.