Unseasonal Rain : अवकाळीचा कोल्हापूर-सांगलीला फटका! कोल्हापुरात उस जमीनदोस्त; सांगलीत द्राक्ष बागायतदार चिंतेत

Unseasonal Rain In Kolhapur And Sangli : राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. कोल्हापूरसह सांगलीत देखील अवकाळी पाऊस झाला आहे.
Unseasonal Rain
Unseasonal RainsAgrowon
Published on
Updated on

Pune News : गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध बागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे सोयाबीन, कापूस, तूर आणि कांद्याला फटका बसला आहे. तर आता कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात देखील शनिवारी पडलेल्या पावसामुळे ऊस आणि द्राक्ष पिकाचे नुकसान झाले आहे.

कोल्हापुरात अवकाळीचा तडाखा

कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागाला शनिवारी रात्री मुसळधार अवकाळी पावसाने तडाखा दिला. पन्हाळा, शिरोळ, हातकणंगले, शाहुवाडी, चंदगड, करवीर तालुक्यांना पावसाने झोडपून काढले. यामुळे ऊसतोड खोळांबली असून यामुळे साखर कारखाने, गुऱ्हाळघरे, वीटभट्टीमालक अडचणीत आले आहेत.

Unseasonal Rain
Unseasonal Rain Kolhapur : कोल्हापुरात ६ तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपले; नाचणी, ऊस, जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान

मुसळधार अवकाळी पावसाचे पाणी साचल्याने ऊसतोड थांबली. तर उसाचे उभे पीक जमीनदोस्त झाले आहे. यामुळे ऐन तोडणीला आलेला उसाची तोडणी होऊ शकलेली नाही. तर तोडप्यांनी आपला मोर्चा कारखान्यांच्या सागण्याने रस्त्याशेजारील ऊसतोडीकडे वळवला आहे.

गुऱ्हाळ घरांवर परिणाम

जिल्ह्यातील झालेल्या अवकाळीमुळे साखर कारखान्यांवर परिणाम झाला असतानाच याचा फटका गुऱ्हाळ घरांना देखील बसला आहे. मुसळधार पाऊस आणि साचलेल्या पावसामुळे शेतात चिखल झाला आहे. यामुळे ऊस शेताबाहेर काढण्यासाठी मजूर लावावे लागत आहेत. तर यासाठी जादाचे जैसे मोजावे लागत आहेत. तर जेथे मजूर नाहीत अशा ठिकाणी जेसीबी यंत्रणा लावावी लागत आहे. यामुळे गुऱ्हाळ घर चालकांना आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे.

Unseasonal Rain
Unseasonal Rain : अवकाळी पावसाने भंगले सोनेरी स्वप्न

द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली

गेल्या दोन दिवसापासून सांगलीत ढगाळ वातावरण तयार झाले. शुक्रवारी आणि शनिवारी सलग दोन दिवस शिराळा तालुक्यातील काही भाग आणि आष्टा, इस्लामपूर परिसरात पाऊस झाला. यामुळे पावसासोबतच ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे. तर येथेही ऊसतोडीत अडचणी निर्माण झाल्या आहेत.

जिल्ह्यातील मिरज, आष्टा, इस्लामपूर परिसरात पावसामुळे एकीकडे रब्बी पिकांना पोषक स्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे सखल पाणी साचल्याने ऊसतोडी थांबवावी लागली आहे. गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि पावसामुळे द्राक्ष बागायतदारांची चिंता वाढली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com