Unseasonal Rain : नगर जिल्ह्यात महिनाभरात वादळी पावसामुळे नऊ बळी

अवकाळी पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार हजेरी लावली. विजा पडल्याने ९ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.
Unseasonal Rain
Unseasonal RainAgrowon

Nagar News अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार हजेरी लावली. विजा पडल्याने ९ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. लहान-मोठी, अशी २९ जनावरे दगावली आहेत. ६४४ मालमत्तांचे अंशतः नुकसान झाले आहे.

नगर जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका आणि चारा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आंबा, द्राक्षे, चिकू, संत्रा, मोसंबी या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

वादळी वाऱ्यामुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. नेवासे, राहुरी, संगमनेर, जामखेड, पारनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदे, राहाता या तालुक्यांतील चारशेपेक्षा अधिक गावांना फटका बसला आहे.

Unseasonal Rain
Nagar Unseasonal Rain : नगर जिल्ह्यात वादळी पावसाचा धुमाकूळ सुरूच

अवकाळी पावसामुळे ९ व्यक्तींचा वीज, झाडे आणि घरे अंगावर पडल्याने मृत्यू झाला. नेवासे तालुक्यातील सर्वाधिक तीन जणांचा समावेश आहे. श्रीरामपूर तालुक्यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

नगर, कोपरगाव, राहुरी, जामखेड तालुक्यांतील प्रत्येकी एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अवकाळीमुळे लहान-मोठी, अशी २९ जनावरे दगावली आहेत.

मोठ्या २४ जनावरांचा समावेश आहे. जामखेड ६, कर्जत ४, नेवासे ६, संगमनेर ४, राहाता २, तर श्रीरामपूर, राहुरी तालुक्यातील प्रत्येकी एक, अशा २४ जनावरांचा समावेश आहे. लहान जनावरांमध्ये अकोले तालुक्यातील ४, तर शेवगाव तालुक्यातील एका जनावराचा समावेश आहे.

Unseasonal Rain
Unseasonal Rain : बुलडाणा जिल्ह्यात वादळी पावसाचा कहर

मालमत्तांच्या नुकसानीमध्ये नेवासे आणि राहुरी तालुक्यांतील घरांचे प्रमाण जास्त आहे. नेवासे ३४८, राहुरी २०६, संगमनेर आणि जामखेड प्रत्येकी ३०, श्रीरामपूर १८, राहाता ८, पारनेर २, कर्जत व श्रीगोंदे प्रत्येकी एक घराचे नुकसान झाले आहे.

जनावरांच्या १५ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. जामखेड ७, नेवासे ३, नगर २, तर राहाता, संगमनेर, पाथर्डी प्रत्येकी एका गोठ्याचे नुकसान झाले आहे.

दोन दिवसांमध्ये भरपाईची तरतूद

नैसर्गिक आपत्तीमध्ये व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर दोन दिवसांत (४८ तास) नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. प्रत्यक्षात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जास्त वेळ लागतो. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचा उत्तरीय तपासणीचा अहवाल महत्त्वाचा असतो.

पंचनामा, वारसाचे हमीपत्र आदी कागदपत्रांची आवश्‍यकता असते. मृत व्यक्तीचे कुटुंब हे दुःखात असल्याने काही कागदपत्रे लवकर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मदत देण्यास विलंब होत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com