
Solapur News : बार्शी तालुक्यातील पांगरी, मळेगाव, हिंगणी, बोरगाव, झाडी, उपळे, महागाव, पिंपळगाव, जामगाव, कापशी परिसरात गुरुवारी सायंकाळी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला.
जवळपास अर्धा तास कोसळलेल्या या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कांदा पिकांसह ज्वारी, गहू, हरभरा, आंबा, द्राक्ष या पिकांना मोठा फटका बसला आहे. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंता वाढली आहे.
या भागात ढगाळ वातावरण होते. दिवसभर उन्हाची तीव्रता जाणवत असतानाही सायंकाळी अचानक वातावरण बदलले आणि जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे काढणीला आलेली पिके मोठ्या प्रमाणावर भिजली. कांदा, ज्वारी, गहू आणि हरभऱ्याच्या पिकांवरही या पावसाचा प्रतिकूल परिणाम झाला आहे. आंबा, द्राक्ष बागायतदारांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेली ज्वारी, कांदा यासह कडबा शेतात भिजला आहे.
हातातोंडाशी आलेला घास हिरावला
या अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. वादळी वाऱ्यात व पावसाच्या तडाख्यात द्राक्ष बागेत घडांचा व द्राक्ष मण्यांचा सडा पडला आहे. या आठवड्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे तेजीत असलेले द्राक्ष दर कमी झाले होते.
गुरुवारी रात्री द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर अस्मानी व सुलतानी संकट कोसळले आणि सोन्यासारख्या पिकवलेल्या द्राक्ष बागेचे नुकसान झाले. बोरगाव येथील शेतकरी गजेंद्र जगताप यांच्या विक्रीला आलेल्या द्राक्ष बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.