Unseasonal Rain: अवकाळी पावसाचा पिकांना फटका

Crop Damage in Maharashtra: राज्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांवर मोठे संकट आणले आहे. नाशिक, बुलडाणा, अहिल्यानगर आणि मराठवाड्यात हजारो हेक्टरवरील रब्बी पिके उध्वस्त झाली आहेत.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Pune News: राज्यात अनेक जिल्ह्यांत गेल्या तीन-चार दिवसांपासून वादळी-वाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, बाजरी, मका, हळद, कांदा, टोमॅटो, वाटाणा, चारा यांसह आंबा, काजू, डाळिंब, द्राक्ष, टरबूज, संत्रा. पपई, पेरू या फळपिकांचे नुकसान झाले. नाशिकमध्ये ७३ गावांत ४४९७ हेक्टर क्षेत्रावर ६,३९३ शेतकऱ्यांचे, बुलडाणा जिल्ह्यात सुमारे ४२०० हेक्टरवर, तर अहिल्यानगरमध्ये ५० गावांमध्ये अडीच हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज पडून एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर काही ठिकाणी वीज पडून जनावरांचाही मृत्यू झाला.

राज्यात गेल्या चार दिवसांपासून अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसासह अनेक भागांत गारपीटही झाली. नाशिक, अकोला, बुलडाणा, अहिल्यानगर, मराठवाडा, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. बुलडाण्यात ४२०० हेक्टरपर्यंत नुकसानीचा अंदाज आहे. जिल्ह्यात सर्वाधिक फटका मका उत्पादकांना बसला. शेतशिवारातील मका जमीनदोस्त झाला.

Crop Damage
Unseasonal Rain : अवकाळी पावसामुळे हापूस डागाळण्याची भीती

अहिल्यानगरला अडीच हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झाले. यामध्ये गहू, कांदा, टोमॅटो, वाटाणा, भाजीपाला या पिकांसह आंबा, डाळिंब, द्राक्ष, लिंबू, पेरू या फळबागांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या पाऊस व गारपिटीमुळे अनेक भागांत दाणादाण उडाली. रब्बी हंगामातील कांदा, गहू, डाळिंब व भाजीपाला पिकांचे नुकसान आहे. मालेगाव, सटाणा व चांदवड तालुक्यांत अधिक नुकसान आहे. जिल्ह्यात ७३ गावांमध्ये ४ हजार ४९७ हेक्टर क्षेत्रावर ६३९३ शेतकऱ्यांचे नुकसान असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे.

Crop Damage
Crop Damage : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने भाजीपाला पिकांचे नुकसान

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील काही भागांत अवकाळी पावसासह गारपीट झाली. यात गहू, बाजरी, मका, आदी पिके आडवी झाली. चारा पीक पावसामुळे भिजून नुकसान झाले. बीड जिल्ह्यात केकनवाडी शिवारात वीज पडून देविदास केकान (वय ६५) यांचा मृत्यू झाला. लातूर-धाराशिव जिल्ह्यांत दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. रब्बीतील ज्वारी व गहू पिकांना पावसाचा फटका बसला. काही भागांत कांद्याचे नुकसान झाले. द्राक्षासह अन्य फळबागांनाही पावसाचा फटका बसला. वादळी वाऱ्याने आंब्याचे मोठे नुकसान झाले. धाराशिव जिल्ह्यात द्राक्ष व आंब्याच्या फळबागांना पावसाचा फटका बसला.

सिंधुदुर्गात आंबा, काजूला तडाखा

जिल्ह्यात चौथ्या दिवशी शुक्रवारी (ता. ४) पहाटे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. गेले चार दिवस सुरू असलेल्या वादळी पावसाचा तडाखा आंबा, काजू पिकांना बसला आहे. किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस झाल्याने आंबा पीक संकटात सापडले आहे. देवगड तालुक्यातील खुडी येथे वीज पडून दोन बैल दगावले. देवगड, वैभववाडी आणि कुडाळ तालुक्यांला पावसाने झोडपून काढले. देवगड, वेंगुर्ला आणि मालवण तालुक्यांत आंबा हंगाम सुरू आहे. पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे आंबा पिकात फळगळ झाली. काजू पिकाचे देखील मोठे नुकसान झाले.

परभणी, हिंगोलीत हळद भिजली

मुखेडला अवकाळी पावसाने झोडपले

छत्रपती संभाजीनगरसह, परभणी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वीज पडून गायी, बैलांचा मृत्यू झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com