
Sangli News : शिराला तालुक्यात सर्वाधिक भात पीक घेतले जाते. रोहिणीचा पेरा अन् मोत्याचा तुरा अशी बळीराजाची म्हण असून या मुहूर्तावर बहुतांश शेतकरी खरीप हंगामातील धूळवाफेवरील भातपिकाच्या पेरणीला पावसाच्या आधी प्रारंभ करतात.
मे सुरू असला, तरीही मात्र अद्याप शिराळा तालुक्यात अवकाळी व वळवाच्या पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हंगामातील भातपिकाची पेरणी लांबणीवर जाण्याची भीती निर्माण झाली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
शिराळा तालुक्याचे भात पिकाचे सरासरी क्षेत्र १२,५०० हेक्टर इतके आहे. गतवर्षी तालुक्यात १०,९०६ हेक्टरवर पेरा झाला होता. तालुक्याच्या पश्चिम व उत्तर भागात रोहिणीच्या मुहूर्तावर धूळवाफेवरील पेरणीला प्रारंभ होतो.
मात्र वळवाच्या व अवकाळी पावसाने पाठ फिरवल्यामुळे पश्चिम व उत्तर भागात खरीप पेरणीपूर्व मशागतीला गती यायला पाहिजे होती. मात्र पावसाने दडी मारल्यामुळे अपवाद वगळता अद्याप मशागतीच्या कामाला गती आलेली नाही. मिनी कोकण अशी ओळख असणाऱ्या संपूर्ण शिराळा तालुक्यात शेतातील कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ ६३ हजार ४१० हेक्टर असून त्यापैकी पिकाखालील क्षेत्र ३७ हजार ८५२ हेक्टर आहे. यामधील चालू वर्षी २९ हजार १३० हेक्टरमध्ये पेरणी होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
यामध्ये सर्वाधिक १३ हजार ६१३ हेक्टरमध्ये भात पिकाची पेरणी होण्याची शक्यता आहे. २ हजार २०५ हेक्टरमध्ये ज्वारी, १ हजार २६२ हेक्टरमध्ये मका, नाचणी, अन्य तृणधान्य, भुईमूग १ हजार १३३ हेक्टर, सोयाबीन २ हजार ५०० हेक्टर आदी पिकांसह या पेरण्यांची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.