Nashik Rain Update : शेतकरी दुहेरी संकटात; दुष्काळाने पिके वाळली, आता वळवाने अनेक हेक्टर पीकं जमिनदोस्त

Water Shortage : नाशिक जिल्ह्यातील विविध धरणातील पाणीसाठा घटत चालला असून पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे.
Unseasonal rain
Unseasonal rainAgrowon

Pune News : राज्यातील अनेक भागात गेल्या चार दिवसापासून अवकाळीने झोडपून काढले असून सोसाट्याचा वाऱ्यासह गारपीट झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून उभे पीक मातीमोल झाले आहे. तर फळबागांना सर्वाधिक फटका बसला असून टरबूज, पपई, संत्र्यासह आंबा बागांमध्ये फळांचा सडा पडल्याचे दिसत आहे. यादरम्यान नाशिकमध्ये मात्र एकिकडे अवकळीचा धुमाकूळ सुरू असतानाच दुसरकडे पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे.

नाशिक शहरासह ग्रामीण भागात सलग चार दिवसांपासून अवकाळीने जोर धरला आहे. येथे मंगळवारी (ता.१४) देखील अवकाळीच्या सरी बरसल्या. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शहरासह ग्रामीण भागात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. यामुळे शहरातील वातावरणाचा पारा काही चढला. यावेळी शहरात ३७.७ अंश सेल्सियस अशी तापमानाची नोंद झाली. दरम्यान हवामान विभागाने आज बुधवारी (ता. १५) देखील जिल्ह्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला आहे. तसेच प्रतितास तीस ते चाळीस किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील अशी शक्यताही विभागाने वर्तवली आहे.

Unseasonal rain
Unseasonal Rain Update : पश्चिम महाराष्ट्रात 'अवकाळी'ची दमदार 'बॅटिंग'; बारामतीत घराचे पत्रे उडाले, पुणे-अहमदनगरला ‘यलो अ‍ॅलर्ट’,

दरम्यान मंगळवारी जिल्ह्याच्या विविध भागात पहाटे सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. तसेच सायंकाळीही हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

मतदानावर बहिष्कार

यावेळी त्र्यंबकेश्वर आणि बागलाण तालुक्यात शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावं लागले आहे. शहरासह तालुक्यात तोरंगण, हरसूलला मुसळधार पाऊस झाला. येथे पडलेल्या मुसळधार पावसामुळे नवीन घरकुल पडल्याने संसार उघड्यावर आला. तर अनेक घरांचे छप्पर उडाले, भिंती कोसळल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी आंबा बागांचेही मोठे नुकसान झाले असून तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तोरंगणच्या रहिवाश्यांसह शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच ही भरपाई न मिळाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

१५ बकऱ्यांचा मृत्यू

विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने बागलाण तालुक्यात लाखांचे नुकसान केले. येथील टेंभे वरचे गावातील एका घरावर वीज कोसळ्याले १५ बकऱ्यांचा मृत्यू झाला. तसेच संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जीवीतहानी झाली नाही. यामुळे भाऊसाहेब महादू माळी यांनी प्रशासनाने याचा लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

Unseasonal rain
Unseasonal Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळीने लाखोंचे नुकसान; कोठे छत उडाले तर कुठे वीज पडली

नाशिक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आलेल्या प्राथमिक अहवालानुसार ८ ते ११ मे या कालावधीत जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ५१३ हेक्टवरील पिके व फळबागांचे नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यातील ४१ गावांना याचा फटका बसला आहे. सर्वाधिक नुकसान हे आंबा पिकाचे झाले असून त्याचे क्षेत्र ४७५ हेक्टर आहे. तर १ हजार ३३८ शेतकरी बाधित झाले आहेत. तसेच यामध्ये डाळिंब (४.५ हेक्टर), द्राक्षे (१.२१ हेक्टर) मका व कांद्याचेही नुकसान झाले असून २४ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाल्याचाही अंदाज यात वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान नाशिक विभागातील सर्व ५३७ धरणातील पाणीसाठा हा २७.७८ टक्क्यांवर आला असून तो मागील वर्षी याच दिवशी ४४.७८ टक्के होता. जिल्ह्यातील विविध धरणातील पाणीसाठ्यात घट होणे सुरूच असून विविध ३२० गावे, ८२४ वाड्यांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. येथे सध्या ३५२ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. एकिकडे जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष वाढत असून दुसरीकडे अवकाळीने जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com