Pomegranate Orchard Management : अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे नुकसान झालेल्या बागेचे व्यवस्थापन

Pomegranate Orchard : डाळिंब बागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेले नुकसान भरून काढणे शक्य नसले, तरी त्यातून बाग वाचविण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी वेगवेगळ्या अवस्थांमधील डाळिंब बागांची खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.
Pomegranate Orchard
Pomegranate Orchard Agrowon
Published on
Updated on

डॉ. ज्योत्स्ना शर्मा, डॉ. सोमनाथ पोखरे, डॉ. एन. व्ही. सिंह, डॉ. मंजूनाथा एन., डॉ. मल्लिकार्जुन, डॉ. राजीव मराठे

मागील काही दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे फळपिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या फळपिकांमध्ये नुकसानीची पातळी ही ५ ते १० टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत होणे शक्य आहे. डाळिंब बागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेले नुकसान भरून काढणे शक्य नसले, तरी त्यातून बाग वाचविण्यासाठी प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी वेगवेगळ्या अवस्थांमधील डाळिंब बागांची खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.

बागेच्या अवस्थेनुसार करावयाचे उपाय

सर्व फळांचे नुकसान, फांद्या तुटणे किंवा चिरणे

सर्व नुकसानग्रस्त फळे बागेतून बाहेर काढावीत. तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्या छाटून बागाबाहेर नेऊन त्यांची विल्हेवाट लावावी.

छाटलेल्या फांद्या व खोडांवर १० टक्के बोर्डो पेस्ट लावावी. त्यानंतर १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

खतांचा हलका डोस देऊन बागेला विश्रांती देऊन पुढील बहराची तयारी करावी.

Pomegranate Orchard
Unseasonal Rain : द्राक्ष, डाळिंब बागायतदार चिंतेत; अवकाळी पावसाचा फटका, शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत

तोडणीसाठी तयार झालेली फळे

गारपिटीमुळे इजा झालेल्या फळांची काढणी करावी. फळांमध्ये कुज दिसून येत नसल्यास त्यांची तत्काळ विक्री करावी.

चिरलेली, नुकसानग्रस्त किंवा कुजलेली फळे गोळा करून एकत्रितपणे कंपोस्ट खड्ड्यात टाकावीत.

फळांच्या काढणीपूर्वी बोरिक ॲसिड २ ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे संरक्षणात्मक फवारणी घ्यावी. त्यामुळे इजा झालेल्या फळांमध्ये कुज टाळण्यास मदत होईल.

जास्त इजा झालेल्या फळांचा उपयोग बियांमधून तेल काढण्यासाठी करता येईल.

१ महिन्यांनंतर तोडणीस येणारी फळे

तक्ता क्र. १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे फवारणी किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.

लिंबू आकाराची फळे

बागेतील ७५ टक्के फळांचे गारपीट व पावसाने नुकसान झाले असेल, तर झाडावरील सर्व फळे काढून टाकावीत. अ.क्र. १ मध्ये शिफारस केल्याप्रमाणे पुढील बहराची तयारी करावी.

२५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी प्रमाणात फळांचे नुकसान झालेले असल्यास, अशी फळे काढून टाकावीत. तक्ता क्र. १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे फवारणी किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. वेळापत्रकानुसार फवारणी करून उर्वरित फळांचे संरक्षण करावे.

फुलधारणा व फळधारणेस सुरुवात

प्रादुर्भित किंवा इजा झालेल्या फुलकळ्या, फळे काढून टाकावीत. तक्ता क्र. १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे फवारणी किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे.

अधिक फूल आणि फळधारणेसाठी काही काळ वाट पाहावी. समाधानकारक फुले व फळधारणा दिसून आल्यानंतर शिफारशीप्रमाणे एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापन करून बहर चालू ठेवावा. अन्यथा बागेला विश्रांती द्यावी.

विश्रांती अवस्थेतील, फळे नसलेली, फांद्या तुटलेली झाडे

सर्व नुकसानग्रस्त, तुटलेल्या आणि चिरलेल्या फांद्यांची छाटाणी करावी. त्यांची बागेबाहेर नेऊन विल्हेवाट लावावी.

छाटलेल्या फांद्या व खोडांवर १० टक्के बोर्डो पेस्ट लावावी. त्यानंतर १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.

विश्रांती अवस्थेत खतांच्या मात्रा दिल्या नसल्यास त्वरित देऊन घ्याव्यात. शिफारशीप्रमाणे विश्रांती अवस्थेतील एकात्मिक रोग व कीड व्यवस्थापन करावे.

Pomegranate Orchard
Pomegranate Rates : डाळिंबाच्या प्रति किलोस २० ते २५ रुपयांची घसरण; आवकेत वाढ मात्र उठाव कमी

गळून पडलेली पाने, जखमा किंवा चट्टे असलेली फळे

फळांमध्ये तुलनेने कमी इजा झालेली असेल, तर तक्ता क्र. १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवस्थापन करावे.

एकात्मिक कीड-रोग व्यवस्थापन

विश्रांती काळातील बागेसाठी

विश्रांती काळात १ टक्का बोर्डो मिश्रण किंवा

२-ब्रोमो-२-नायट्रोप्रोपेन-१,३-डायॉल (ब्रोनोपॉल ९५ टक्के) ०.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी यासोबत कॉपरयुक्त बुरशीनाशके जसे की, कॉपर ऑक्सिक्लोराईड (५० टक्के डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा कॉपर हायड्रॉक्साइड (५३.८ टक्के डब्ल्यूपी) २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून २ फवारण्या १० ते १५ दिवसाच्या अंतराने घ्याव्यात.

फळधारणा झालेल्या बागेसाठी

०.५ टक्का बोर्डो मिश्रणानंतर स्ट्रेप्टोमायसिन* (स्ट्रेप्टोमायसिन सल्फेट ९० टक्के अधिक टेट्रासायक्लिन हायड्रोक्लोराइड १० टक्के) ०.५ ग्रॅम किंवा

२-ब्रोमो-२-नायट्रोप्रोपेन-१,३-डायॉल (ब्रोनोपॉल ९५ टक्के) ०.५ ग्रॅम प्रति लिटर यासोबत कॉपरयुक्त बुरशीनाशके, जसे की - कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० टक्के डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम किंवा

कॉपर हायड्रॉक्साइड (५३.८ टक्के डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) २ ग्रॅम किंवा योग्य त्या बुरशीनाशकांची ७ ते १० दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. यामध्ये गरजेनुसार कीटकनाशक मिसळून वापरावे.

ज्या बागांमध्ये तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी, स्ट्रेप्टोमायसिन* आणि २-ब्रोमो-२- नायट्रोप्रोपेन-१,३-डायॉल (ब्रोनोपॉल) यांचा वापर करू नये. फक्त बुरशीनाशके व कीटकनाशकांचा वापर करावा.

शिफारशीप्रमाणे खत व्यवस्थापन करावे.

- डॉ. ज्योत्स्ना शर्मा, ९६२३४४४०९७

-डॉ. सोमनाथ पोखरे, ९९२२१००४०१

(राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर)]

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com