Pesticide Selling : दुय्यम दर्जाच्या कीटकनाशकांची विनापरवाना विक्री भोवली

शेतात ग्लायफोसेट ४१ टक्के प्रमाणात तणनाशकांचा उपयोग केला जातो.
Pesticide
PesticideAgrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्ह्यात फळ व भाजीपाला पिकांखाली (Vegetable Crop) मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. ग्लायफोसेट (Glyphosate) ४१ टक्के या तणनाशकाचा शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

मात्र दुय्यम दर्जाच्या तणनाशकाची विनापरवाना उत्पादन व विक्री केल्याचे पाहणीदरम्यान जिल्हा भरारी पथकाला आढळून आले होते.

त्यानुसार गुजरातमधील ग्रीन ॲग्रो बायोटेक (Agro Biotech) व आर्या क्रॉप सायन्स या दोन कंपन्यांविरोधात पोलिस पंचवटी ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेतात ग्लायफोसेट ४१ टक्के प्रमाणात तणनाशकांचा उपयोग केला जातो. जिल्हा भरारी पथकामार्फत कीटकनाशके विक्री केंद्राची नियमित तपासणी करताना नाशिक शहरातील पंचवटीत जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी अभिजित जमधडे, पंचायत समिती कृषी अधिकारी विजय चौधरी यांना एका कीटकनाशक विक्रेत्याकडे संबंधित कंपनीचे ‘ग्लायग्रीन’ नामक तणनाशक विक्रीला ठेवल्याचे आढळून आले होते.

Pesticide
Online Pesticide Sale : ऑनलाइन कीटकनाशक विक्रीला केंद्राची परवानगी

या तणनाशकाबाबत विक्रेत्याकडे कंपनीचे उगम प्रमाणपत्र तसेच परवान्याविषयी माहिती नसल्याने, तसेच गुणवत्तेबाबत संशय आल्याने कीटकनाशक साठा, विक्री बंद आदेश देऊन भरारी पथकाने नमुने घेतले होते.

पथकाने हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले असता प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालावरून ग्रीन ॲग्रो बायोटेक कंपनीने विपणन केलेला नमुना मोठ्या फरकाने अप्रमाणित असल्याचे आढळून आले होते. कंपनीकडे परवाना नसल्याचे सिद्ध झाले.

पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद

विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांचे आदेश व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, माजी कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार मोहीम अधिकारी अभिजित जमधडे यांनी संबंधित कंपनी विरोधात पंचवटी पोलिस ठाणे येथे कीटकनाशक कायदा १९६८, कीटकनाशक नियम १९७१, भादंवि कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रतीक पाटील करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com