Union Minister Nitin Gadkari : आरएसएसनंतर आता गडकरी यांची शेतकरी आंदोलनावर टीका; म्हणाले, 'आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित'

Delhi Farmers' Protest : दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सीमांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर आरएसएसने टीका केल्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील टीका केली आहे.
Union Minister Nitin Gadkari On Delhi Farmers' Protest
Union Minister Nitin Gadkari On Delhi Farmers' ProtestAgrowon

Pune News : पंजाब आणि हरियानातील शेतकरी हमीभाव कायद्यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी १३ फेब्रुवारीपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. आंदोलक शेतकरी दिल्लीच्या सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या तीन सीमांवर आंदोलन करत आहेत. तर ते आपल्या मागण्यांवर ठाम असून आता देशात लोकसभा निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. या यादरम्यान शेतकरी आंदोलनावर आरएसएसने टीका होती. यावरून शेतकरी नेते भडकले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील शेतकरी आंदोलनावर टीका केली आहे. गडकरी यांनी बुधवारी (ता.२८) शेतकऱ्यांचे दिल्लीतील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित' असल्याचे म्हटले आहे. 

राजकीयदृष्ट्या प्रेरित आंदोलन

सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून आचारसंहिता लागू आहे. तर दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. दरम्यान या आंदोलनावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी आरोप केल्यानंतर आता गडकरी यांनी देखील शेतकरी आंदोलनावर टीका करताना आरोप केला आहे. गडकरी यांनी, या आंदोलनाला 'राजकीयदृष्ट्या प्रेरित' असल्याचे म्हटले आहे. तसेच यंदाचे आंदोलन हे २०२० मधील कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाची  पुनरावृत्ती असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

Union Minister Nitin Gadkari On Delhi Farmers' Protest
Delhi Farmers' Protest : दिल्लीत शेतकऱ्यांची महापंचायत; पंजाबमधील शेतकरी ८०० हून अधिक बस, ट्रक आणि अनेक गाड्यांमधून दिल्लीच्या दिशेने

शेतकऱ्यांची दिशाभूल होणार नाही

गडकरी म्हणाले, या आंदोलनामुळे यंदा देशातील शेतकऱ्यांची दिशाभूल होणार नाही. उलट मतदानावेळी शेतकरी भाजपला साथ देतील. निवडणुकीदरम्यान शेतकऱ्यांचा होणारा विरोध हा राजकीय हेतूने प्रेरित आहे. आमचे सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले असून मोदी सरकारने गेल्या दोन टर्ममध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. यामुळेच शेतकऱ्यांच्या विरोधानंतर केंद्राने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले.

तपास यंत्रणा चौकटीतच काम करतात

सध्या देशातील विरोधी पक्षातील नेते आणि प्रमुखांवर केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने दबाव आणला जात आहे, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. यावरून गडकरी म्हणाले की, केंद्रीय तपास यंत्रणा त्यांचे काम करतात. यात सरकार, नेते, मंत्री किंवा पंतप्रधान यांचा काही संबंध नाही. तर कायद्याच्या चौकटीतच यंत्रणा काम करतात. यामुळे आमचे ४०० हून अधिक खासदार निवडणून येणार. 

तसेच देशभरातील सर्वसामान्य, शेतकऱ्यांच्या हितासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेवर यावे असा लोकांचा विश्वास आहे आणि ते येईल अशी आमची खात्री आहे असेही गडकरी म्हणाले. 

Union Minister Nitin Gadkari On Delhi Farmers' Protest
Farmer Protest : आरएसएसच्या वक्तव्यावरून पंढेर यांचा पलटवार; म्हणाले, 'आरएसएस शेतकऱ्यांचा अपमान...'

काँग्रेसवर निशाणा साधला

सध्या काँग्रेस आणि विरोधकांकडून संविधान मोडीत काढले जात आहे, अशी ओरड सुरू आहे. मात्र काँग्रेसच्या राजवटीत ८० वेळा संविधानाची मोडतोड केली गेली. आम्ही  राज्यघटनेचा आदर करतो आणि ते बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा टोला काँग्रेसला गडकरी यांनी लगावला आहे. 

निवडणूक बाँड

तसेच रोखेवरून गडकरी यांनी, निवडणूक बाँड योजना आम्ही पारदर्शकतेसाठी लागू केले आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने असंवैधानिक घोषित केले. पण आता हा विषय न्यायालयाचा आहे. यामुळे काही नवीन आले तर नक्कीच विचार करू असेही गडकरी यांनी म्हटले आहे. 

काय म्हटले होते आरएसएसने 

याआधी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरून शनिवारी (ता.१६) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने टीका केली होती. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी, शेतकरी आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर शेतकरी आंदोलनाद्वारे पंजाबमध्ये फुटीरतावादी दहशतवादाला प्रोत्साहन दिले जात असल्याचा आरोप केला होता. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com