
Pune News : केंद्र सरकारने सोमवारी (ता.२५) नैसर्गिक शेती मिशनबाबत निर्णय घेतला होता. यापाठोपाठ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी रेल्वेने मोठा निर्णय घेतला असून दोन नव्या मार्गांची घोषणा केली. याबाबतची माहिती केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे भवन येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
तीन रेल्वे मार्गांसाठी ७ हजार ९२७ कोटी
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रिय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या महत्वाच्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स (CCEA) कडून महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधीत नव्या तीन रेल्वे मार्गांना मंजूरी दिल्याची माहिती त्यांनी दिली. या रेल्वे मार्गांना पूर्ण करण्यासाठी ७ हजार ९२७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात करण्यात आली असून यातील दोन रेल्वे मार्ग महाराष्ट्रातील असल्याची माहिती दिली होती.
महाराष्ट्रातील दोन रेल्वे मार्ग
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगांव, नंदुरबार नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, कळवण, देवळा प्रदेशासह उत्तर प्रदेशच्या पूर्वेकडून प्रदेशाशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जळगाव-मनमाड (चौथा) मार्ग महत्वाचा ठरणार असल्याचेही अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. तसेच या रेल्वे मार्गांना मंजुरी मिळाल्यामुळे, या मार्गावरून होणाऱ्या माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूकीला आता चालना मिळेल. तसेच स्थानिक रोजगार निर्मिती पर्यटन वाढेल असा दावा अश्विनी वैष्णव यांनी केला आहे. (new railway lines approved in Maharashtra)
तर रेल्वेने मंजुरी दिलेल्या तीन प्रकल्पांच्या ३७५ किलोमीटरच्या मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पांतर्गत जळगाव मनमाड चौथा रेल्वे मार्ग (१६० किलोमिटर) भुसावळ ते खंडवा तिसऱ्या आणि चौथा रेल्वे मार्ग (१३१ किलोमिटर) आणि प्रयागराज माणिकपूर तिसरा रेल्वे मार्गांचा (८४ किलोमिटर) समावेश आहे.
मनमाड ते जळगावदरम्यान १६० किमी लांबीची चौथी रेल्वे लाइन टाकली जाणार असून यासाठी २ हजार ७७३ कोटींचा खर्च होणार आहे. तर भुसावळ ते खंडवा या मार्गावर १३१ किमी लांबीची तिसरी आणि चौथी रेल्वे लाइन टाकली जाणार आहे. या मार्गासाठी ३ हजार ५१४ कोटी रुपये खर्च येणार असल्याची माहितीही अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प चार वर्षात पूर्ण होणार
महाराष्ट्रासह तीन राज्यातून हा रेल्वे मार्ग जाणार असून शेतकऱ्यांच्या मालाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी मदत मिळणार आहे. तर हा प्रकल्प पुढील चार वर्षात पूर्ण होईल, असाही आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.
नैसर्गिक शेती मिशनला मंजूरी
दरम्यान केंद्र सरकारने मंगळवारी (ता.२६) नैसर्गिक शेती मिशनबाबत निर्णय घेतला. मिशनतंर्गत पुढील दोन वर्षात नैसर्गिक शेतीचे १५ हजार क्लस्टर उभारण्यात येणार असून यासाठी २ हजार ४८१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नैसर्गिक शेती मिशनमधून देशातील १ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार असून ७.५ लाख हेक्टर क्षेत्रावर नैसर्गिक शेती केली जाईल, असा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.