
Jalgaon News : खानदेशात यंदा पाऊसमान बरे आहे. जूनमध्येही वेळेत पाऊस नव्हता. जूनच्या अखेरीस पाऊस आला. पेरण्याही १५ जूननंतर अनेक भागात झाल्या. यात जळगावात जूनमधील पावसाची सरासरी दिसत आहे. अन्य भागातही अशीच स्थिती आहे.
धुळ्यात एकूण ५६५ मिलिमीटर, नंदुरबारात ८५४ मिलिमीटर आणि जळगावात ६३२ मिलिमीटर पाऊस पडतो. यात जळगाव जिल्ह्यात जूनमध्ये १२३ मिलिमीटर पाऊस बरसतो. या तुलनेत जिल्ह्यात २८ जूनपर्यंत १२१ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
यामुळे पाऊसमान जूनमध्ये बरे दिसत आहे. चाळीसगाव, धरणगाव, पारोळा, बोदवड आदी भागात काही महसूल मंडळांत मागील आठवड्यात अतिवृष्टी झाली. पण काही भागात मध्यम ते हलका पाऊस झाला. यात यावल, रावेर व अमळनेर तालुक्यात पाऊसमान समाधानकारक नाही.
जळगाव जिल्ह्यात आवर्षणप्रवण
भागात पाऊसमान चांगले आहे. पाचोरा, भडगाव, अमळनेर, धुळ्यातील शिंदखेडा, धुळे, नंदुरबारातील नंदुरबार, नवापूर, शहादा या भागातही पाऊसमान बरे आहे. पण अजून सिंचन प्रकल्पांतील जलसाठा वाढलेला नाही. फक्त तापी नदीवरील भुसावळ (जि.जळगाव) लगतच्या हतनूर व चाळीसगाव (जि.जळगाव) लगतच्या गिरणा धरणातील जलसाठा वाढला आहे. हतनूरमधून विसर्ग सुरू आहे.
मागील आठवड्यात आठ दरवाजे उघडून त्यातून विसर्ग सुरू झाला होता. कारण तापी नदीच्या मध्य प्रदेशातील उगम क्षेत्रात व सातपुडा भागात पाऊस झाला. गिरणा धरणाचे लाभक्षेत्रही गुजरातमधील सापुतारा व नाशिक जिल्ह्यात असून, या भागात पाऊस झाल्याने गिरणातील जलसाठा ३२ टक्के एवढा झाला आहे.
हतनूरमधून जलसाठा नियंत्रणासाठी पाणी सोडले जात आहे. यात धुळे जिल्ह्यात काही भागात शेतांमधून पाऊस वाहून निघाला आहे. पण काही भागात तुरळक, हलका ते मध्यम पाऊस झाला. पण यात पेरण्याही पूर्ण होत आल्या आहेत. या आठवड्यात खानदेशात पेरणी अधिकची होईल, अशी स्थिती आहे.
नद्यांना प्रवाही पाणी नाही
खानदेशात पाऊसमान बरे आहे. पण तापी नदी वगळता अन्य नद्यांना चांगले प्रवाही पाणी आलेले नाही. मागील काही दिवसात तापी नदीवरील भुसावळ (जि.जळगाव) नजीकच्या हतनूर धरणात पाण्याची चांगली आवक झाली.
यामुळे हतनूर धरणातून विसर्ग सुरू झाला व तापी नदीत प्रवाही पाणी आले. तापी नदीवरील शेळगाव, धुळ्यातील सुलवाडे, नंदुरबारातील सारंगखेडा, प्रकाशा बॅरेजमधूनही पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गिरणा नदीसही प्रवाही पाणी आलेले नाही. तसेच धुळ्यातील अनेर, पांझरा, जळगावातील अंजनी, गिरणा, वाघूर व अन्य नद्यांत प्रवाही पाणी आलेले नाही.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.