Bogus Seed : काटोल, नरखेडमध्ये बोगस बियाण्यांचे जाळे

Kharif Season : राज्यामध्ये प्रतिबंधित बीटी बियाणे विक्रीचे मोठे रॅकेट काटोल आणि नरखेड तालुक्यांत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष आतिश उमरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
Bogus Seed Sell
Bogus Seed SellAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : राज्यामध्ये प्रतिबंधित बीटी बियाणे विक्रीचे मोठे रॅकेट काटोल आणि नरखेड तालुक्यांत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेतील विरोधी पक्ष आतिश उमरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. कृषी सभापती याच भागातील असताना हा प्रकार होत असल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.

उमरे यांनी सांगितले, की शेतकऱ्यांकडून बियाणे खरेदीची लगबग सुरू असतानाच जिल्हा परिषद कृषी सभापतींनी अद्यापही साधा बियाणे व खरिपाचा आढावा घेतला नाही. त्यांच्याच नरखेड तालुक्यात व लगतच्या काटोल तालुक्यांमध्ये राज्यात प्रतिबंधित असलेल्या बीटी बियाण्यांची चोरट्या मार्गाने धडाक्यात विक्री सुरू आहे.

Bogus Seed Sell
Bogus Seeds : कोल्हापुरात जिल्ह्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट, सूर्यफुलानंतर पोकळा पीकधोक्यात

या सर्व प्रकारांबाबत सभापती अनभिज्ञ असणे, हे दुर्दैवाची बाब आहे. आता मॉन्सून अवघ्या काही दिवसांमध्येच राज्यासह जिल्ह्यात दाखल होणार आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होत नसल्याची परिस्थिती आहे, परंतु यासर्वांचे सभापती व जि.प. सत्ताधाऱ्यांना काहीच देणे-घेणे नसल्याचे दिसून येत असल्याची टीका विरोधकांनी केली. या वेळी जि. प. सदस्य समीर उमप, माजी उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, संदीप सरोदे आदी उपस्थित होते.

जनावरे लसीकरणापासून वंचित

जनावरांना एकटांग्या, पीपीआर, घटसर्प, लम्पी असे आजार होण्याचा धोका आहे. याला आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी शासनाकडून जिल्ह्याला या जनावरांच्या लसीकरणासाठी लसही उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरणासाठी लस उपलब्ध असतानाही जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरण सुरू झाले नसल्याची परिस्थिती आहे.

Bogus Seed Sell
Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

या सर्वाला सभापतींची निष्क्रियता जबाबदार असल्याची टीकाही विरोधकांनी केली आहे. तसेच जिल्ह्यात उष्णतेची लाट सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये जनावरांची चांगलीच होरपळ सुरू आहे. त्यामुळे जि.प.च्या पशुसंवर्धन सभापतींनी याकरिता तालुकानिहाय आढावा घेण्याची गरज आहे. परंतु त्यांच्याकडून असा कुठलाही आढावा मुख्यालयस्तरावरून अथवा तालुकास्तरावर झाल्याचे पाहायला मिळाले नसल्याची टीकाही उमरेंनी केली.

अधिकाऱ्यांच्या संगनमताने विक्री

प्रतिबंधित बियाण्यांच्या विक्रीबाबत कारवाईसाठी माहिती देण्याची भाषा विभागाकडून होत आहे. जिल्ह्यात कुठे कुणाच्या माध्यमातून या बियाण्यांची विक्री होत आहे, यासंदर्भात कृषी विभागातील अधिकाऱ्यांना सर्व कल्पना नसणे, हाच मोठा विनोद आहे. अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com