Food Wastage : न परवडणारी अन्नाची नासाडी

स्वातंत्र्यानंतर सर्व जनतेला पुरेसे अन्न मिळत नाही, ही परिस्थिती पाहून तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दर सोमवारी सर्वांनी एक दिवस उपवास करावा असे आवाहन केले होते.
Food Wastage
Food WastageAgrowon
Published on
Updated on

स्वातंत्र्यानंतर सर्व जनतेला पुरेसे अन्न (Food) मिळत नाही, ही परिस्थिती पाहून तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांनी दर सोमवारी सर्वांनी एक दिवस उपवास (Fast) करावा असे आवाहन केले होते. याचा उद्देश शिल्लक अन्न उपाशी लोकांना (Hungry) मिळू शकेल. भारत सरकार, कृषी शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांच्या समन्वयातून मोठ्या प्रमाणात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब झाला व हरितक्रांतीचा (Green Revolution) पाया भक्कम होऊन संपूर्ण जनतेला पुरेसे अन्न मिळू लागलं. संपूर्ण जगाची भूक (World Hunger) भागविण्याची क्षमता आपली झाली, पण अजून कितीतरी लोक रोज उपाशी झोपताहेत. अजून काढणीपश्‍चात योग्य तंत्रज्ञान नसल्याने किती तरी अन्नधान्याची नासाडी होते. शेताच्या बांधापासून ताटात येणाऱ्या घासापर्यंतच्या प्रवासात वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नाची नासाडी होते. जगभरात अन्नधान्य नासाडी करणाऱ्या देशाच्या क्रमवारीत आपण दुसऱ्या क्रमांकावर आहोत. या गोष्टीची नक्कीच आपल्याला विचार करावा लागेल.

Food Wastage
Food Processing : मोह फुलांच्या प्रक्रियेमध्ये चांगली संधी

अन्न दान हे आपल्याकडं श्रेष्ठ दान आहे, असं म्हटलं जातं. आता महाप्रसाद, लग्नकार्य, वाढदिवस, बारसं, मुंज, तेरावं, प्रदर्शन, सांस्कृतिक आणि विविध धार्मिक कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात जेवणावळी घातल्या जातात. अशा ठिकाणी ताटात अन्न राखून मोठ्या प्रमाणात नासाडी केली जाते. मोठमोठ्या हॉटेलात, काही ठिकाणी तर ताटात अन्न सोडणे ही प्रतिष्ठा मानली जाते. आता अशा लोकांना कोण सांगणार, की धान्याचा एक न एक दाणा तयार होण्यासाठी पूर्वमशागतीपासून काढणीपर्यंत निसर्गातील विविध प्रकोपातून जसे, की ऊन, वारा, वादळ, वीज, पाऊस, दुष्काळ, पूर, पशुपक्षी आणि कीटक यांच्यापासून सुरक्षित काढणीपर्यंत किती दिवस महिने आणि वर्षाचा कालावधी द्यावा लागतो.

Food Wastage
Food Processing : शेतकऱ्यांनी प्रक्रिया उद्योगाला प्राधान्य द्यावे

देशातील बऱ्याच संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात महाप्रसादाची निर्मिती केली जाते. धर्मस्थळ आणि इतरही काही ठिकाणी अत्यंत स्वच्छ, सुरक्षित आणि हायजेनिक पद्धतीने स्वयंपाक बनविला जातो आणि तितक्याच शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक पंगतीत खाऊ घातला जातो. इथं अन्न वाया जाण्याचं प्रमाण अत्यंत अल्प आहे. त्यातूनही थोडं राहत असेल तर ते किचनरूमच्या बाजूलाच असलेल्या बायोगॅसमध्ये जाऊन त्यापासून इंधन निर्मिती केली जाते. या आणि अशा उपक्रमाची अनुकरणाची गरज सर्वत्र आहे. मोठं मोठ्या हॉटेल आणि इतर कार्यक्रमातून उरलेले अन्न भुकेल्यांना, गरजवंताना पोहोचवणारा तरूणांचा हा स्त्युत्य उपक्रम आहे.

समाजाने अशा लोकांचा सन्मान करणे अपेक्षित आहे. मुळात ताटात अन्नाचा एक कणही राखायचा नाही ही शिकवण लहान मुलांना आई-वडिलांनी त्यानंतर तरुणांना शिक्षकांनी आणि मोठ्यांना सुसंस्कृत समाजाने द्यायला हवी. कारण आपल्या ताटात येणारा अन्नाचा प्रत्येक घास हा निसर्गातील पशुपक्षी, कीटक आणि शेतकरी यांच्या अतीव प्रयत्नातून आणि त्यागातून आलेला असतो. समर्थ रामदास स्वामींनी एका आपल्या श्लोकात सांगितलं आहे.

‘आपण यथेच्छ खाणे, उरले ते वाटणे

परंतु वाया दवडणे, हा धर्म नव्हे’

- कृषिपंडित सुरेश पाटील, (आयसीएआर राष्ट्रीय पुरस्कार विजेते), बुदिहाळ. जि. बेळगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com