Indigenous Desi Cow: देशी गोवंशपासूनच्या उत्पादनांसाठी‘ट्रेड मार्क’ येणार: डॉ. कोळेकर

Panchgavya products: देशी गोवंशावर आधारित शेती आणि उत्पादने प्रमाणित करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग ‘ट्रेड मार्क’ विकसित करत आहे. यामुळे गोमूत्र, शेणखत, पंचगव्य आणि बायोगॅस यासारख्या पर्यावरणपूरक उत्पादनांना अधिक बाजारपेठ मिळेल.
Assistant Commissioner of Kolhapur District Animal Husbandry Department Dr. Shamrao Kolekar
Assistant Commissioner of Kolhapur District Animal Husbandry Department Dr. Shamrao KolekarAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News: ‘‘जातिवंत देशी गाय आणि वळूचे संगोपन हे वंशसुधार आणि दूध उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचे आहेत. पशुपालकांनी केवळ दूध उत्पादनावर मर्यादित न राहता शेण, गोमूत्रापासून सेंद्रिय खत, कीडनाशक, पंचगव्य उत्पादन, बायोगॅस, आदी पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती करावी.

या उत्पादनांच्या गुणवत्तेसाठी पशुसंवर्धन विभाग ‘ट्रेड मार्क’ तयार करत आहे. याचा पशुपालकांना फायदा होणार आहे,’’ असे कोल्हापूर जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. शामराव कोळेकर यांनी सांगितले.

Assistant Commissioner of Kolhapur District Animal Husbandry Department Dr. Shamrao Kolekar
Cow Milk Rate : गोकुळकडून गायीच्या दूध खरेदी दरात २ रूपयांची वाढ; मंत्री हसन मुश्रीफांकडून घोषणा

महाराष्ट्र गोसेवा आयोग, पशुसंवर्धन विभाग, सोशल रिस्पॉन्सिबिलीटी समूह आणि शिवसमर्थ कोकण कपिला गोशाळा व संशोधन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने देशी गोवंश आधारित नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी वेद खिल्लार गोशाळेचे संस्थापक डॉ. नीतेश ओझा,पशुधन विकास अधिकारी डॉ. वृषाली सरवदे, नैसर्गिक शेतीतज्ज्ञ आनंद कोरंटक, बाळासाहेब गद्रे, बापू भोसले, सुनील गद्रे, प्रसाद बेंडके, अजित बेंडके उपस्थित होते.

डॉ. कोळेकर म्हणाले, की जातिवंत दुधाळ देशी गोवंश आपल्या गोठ्यात असला पाहिजे. पशुपालकांनी स्वच्छ दूध उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगाला गटाच्या माध्यमातून चालना द्यावी. शेण, गोमूत्र, औषधी वनस्पती यांचा वापर करून पर्यावरणपूरक उत्पादनातून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीची चांगली संधी आहे.

Assistant Commissioner of Kolhapur District Animal Husbandry Department Dr. Shamrao Kolekar
Cow Health: गाईंमधील बाह्य परजीवींचे नियंत्रण

डॉ. ओझा म्हणाले, की शेण, गोमूत्र, दशपर्णी अर्क, जीवामृत, गांडूळखत आदी उत्पादनांना मागणी वाढत आहे. यातून ग्रामीण भागात देशी गोवंश संगोपन आधारित लघू उद्योग तयार होत आहेत.

नैसर्गिक शेतीतज्ज्ञ आनंद कोरंटक यांनी आरोग्यदायी शेती उत्पादन आणि गोकृपा अमृतम निर्मितीबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन अमित गद्रे यांनी केले. या वेळी पशुसंवर्धन विभागातील पशुधन अधिकारी डॉ. रितेश शिंदे, डॉ. अनुज कोळी, डॉ. सुमीत मदने, प्रताप फाळके, शीलकुमार बंडगर, नंदकुमार बागम तसेच आंबा, चाळणवाडी गावातील पशुपालक आणि तनिष्का महिला शेतकरी गटाच्या सदस्या उपस्थित होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com